श्रीगोंदा: तालुक्यातील काष्टी येथील बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्ट संचलित परिक्रमा शैक्षणिक संकुलातील परिक्रमा फॅकल्टी ऑफ फार्मसी महाविद्यालया

श्रीगोंदा: तालुक्यातील काष्टी येथील बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्ट संचलित परिक्रमा शैक्षणिक संकुलातील परिक्रमा फॅकल्टी ऑफ फार्मसी महाविद्यालयातील 49 विद्यार्थिनींची पुण्यातील नामांकित औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
महाविद्यालयातील 27 विद्यार्थिनींची एजिओ फार्मा, भोसरी (पुणे) येथे तर 22 विद्यार्थिनींची एमक्योर फार्मास्युटिकल्स, पुणे या प्रतिष्ठित कंपनीत मुलाखतीद्वारे निवड झाली.
परिक्रमा फॅकल्टी ऑफ फार्मसी महाविद्यालयाने अल्पावधीतच महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी प्राध्यापकवर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, उत्कृष्ट वसतिगृह सुविधा तसेच विद्यार्थी-केंद्रित शैक्षणिक वातावरण यामुळे राज्याच्या विविध भागांतून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऍड. प्रतापसिंह पाचपुते हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. आधुनिक लॅब, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज क्रीडांगण आणि इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यावर संस्थेचा भर आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. सोनल सोलंकी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. विद्यार्थिनींच्या या घवघवीत यशामुळे पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

COMMENTS