https://youtu.be/-3KXcR2CVw8 अयोध्येतील भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिराला मिळणाऱ्या देणगीत तब्बल ८० टक्क्यांची मोठी घट झाल्याची धक्कादायक माहिती सम
अयोध्येतील भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिराला मिळणाऱ्या देणगीत तब्बल ८० टक्क्यांची मोठी घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे देशभरातील रामभक्तांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी मंदिराला दरमहा सरासरी ७ कोटी रुपयांची देणगी मिळत होती, ती आता थेट दीड कोटींवर आली आहे. मंदिरातील देणगी व्यवस्थापनात कथित गैरव्यवहार झाल्याचा संशय असून, याप्रकरणी आता चौकशी सुरू झाली आहे. देणगी मोजणीशी संबंधित काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आल्याचा आणि देणगी मोजण्याची जागा वारंवार बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीची नियुक्ती करण्यात आली असून, दान मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची कसून चौकशी केली जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावर कडक भूमिका घेत, या घोटाळ्यातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, १५ दिवसांत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे. कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या राम मंदिराची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संत आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष या चौकशीच्या अहवालाकडे लागले आहे.

COMMENTS