Homeताज्या बातम्याबीड

पोलिस पाटील संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी कृष्णा कदम यांची निवडसर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

केज तालुक्यातील धर्माळा गावचे रहिवासी आणि शांत, संयमी स्वभावासाठी ओळखले जाणारे कृष्णा अशोक कदम यांची पोलिस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या

शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांवर 100 रुपये बाँडचा अडथळा’300 पेक्षा जास्त मेडिकल प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळलेबाँड व नोटरीची अट दूर करून सर्व मेडिकल प्रस्ताव तातडीने निकाली काढावे : महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेची मागणी
बीड जिल्ह्यात बेमुदत संपाचा दुसरा दिवस : शासकीय कार्यालयांत शुकशुकाटजुन्या पेन्शनसह प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी ठाम – आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
मलकापूर येथील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हाटवले, 2 वर्षानंतर रस्ता मोकळा  तहसील प्रशासनाचे आभार – भागवत गीते


केज तालुक्यातील धर्माळा गावचे रहिवासी आणि शांत, संयमी स्वभावासाठी ओळखले जाणारे कृष्णा अशोक कदम यांची पोलिस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
ही निवड 11 मे 2026 रोजी जाहीर करण्यात आली असून, संघटनेचे अध्यक्ष दीपक पालीवाल यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्णा कदम यांच्या कार्यनिष्ठा, संघटन कौशल्य आणि समाजाभिमुख भूमिकेचा विचार करून ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे केज तालुका तसेच बीड जिल्ह्यातील विविध सामाजिक व प्रशासकीय स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामस्थ, सहकारी आणि पोलिस पाटील बांधवांनीही त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS