Homeताज्या बातम्या

अर्धापूर तालुक्यात मोठी हळहळ; कर्जबाजारीपणा आणि मुलींच्या शिक्षणाच्या चिंतेतून येळेगाव येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

अर्धापूर : तालुक्यातील येळेगाव येथील शेतकरी गुणाजी बापूराव पवार (वय ३९) यांनी कर्जबाजारीपणा, सततची नापिकी आणि मुलींच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या आर्

नांदेडच्या राजकारणात मोठी खळबळ; अजित पवार गटाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, राष्ट्रवादीला धक्का
नांदेड येथे स्वतंत्र ‘एफडीए’ प्रयोगशाळा सुरू करा; शहर विकास समितीची जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
विष्णुपुरीत उद्यापासून ७ दिवसीय भव्य शिवमहापुराण कथा महोत्सवास प्रारंभ; शिवभक्तांसाठी भक्ती आणि अध्यात्माची पर्वणी
Nimbhora farmer commits suicide by consuming poison

अर्धापूर : तालुक्यातील येळेगाव येथील शेतकरी गुणाजी बापूराव पवार (वय ३९) यांनी कर्जबाजारीपणा, सततची नापिकी आणि मुलींच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चाच्या विवंचनेतून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुणाजी पवार यांच्यावर बँकेचे पीककर्ज तसेच खाजगी फायनान्स कंपनीचे कर्ज होते. गेल्या काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्यातच चार मुलींच्या शिक्षणाचा वाढता खर्च आणि कर्जफेडीचा ताण यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. या नैराश्यातून त्यांनी १५ जून रोजी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. त्यांना तातडीने उपचारासाठी नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच गुरुवारी (दि. १८ जून २०२६) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

गुणाजी पवार यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, चार मुली आणि लहान भाऊ असा परिवार आहे. अत्यंत कष्टाळू आणि तरुण शेतकऱ्याच्या अशा अकाली जाण्याने येळेगाव आणि अर्धापूर परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे शेतकाऱ्यांच्या वाढत्या कर्जबाजारीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून, शासनाने मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

COMMENTS