शिवसेनेच्यावतीने महागाईच्या विरोधात सायकल रॅली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेच्यावतीने महागाईच्या विरोधात सायकल रॅली

नगर -  आज महागाईने उच्चांक गाठला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पुर्णपणे कोलमडले आहे. जीवनवश्यक वस्तूंबरोबरच पेेट्रोल-डिझेलचे भाव दिवसेंदिवस व

गोव्यात युतीची गरज नाही, पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार (Video)
निवडणूक झाल्यावर पुण्यात शिवसेनेचा विजयी मेळावा घेणार… संजय राऊत
शिवसेनेनं बेईमानी करत मुख्यमंत्रिपदाची भूमिका सांगितली आणि भाजपशी युती तोडली

नगर – 

आज महागाईने उच्चांक गाठला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पुर्णपणे कोलमडले आहे. जीवनवश्यक वस्तूंबरोबरच पेेट्रोल-डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असून, शतक पुर्ण करुन आता थोड्यात दिवसांत द्विशतकाकडे वाटचाल सुरु होईल, अशी परिस्थिती आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे सर्वसामान्यांचे रोजगार गेले, नोकर्‍या गेल्या तर काहींच्या जवळच्या व्यक्ती निधन पावल्या आहेत. अनेकांजण हॉस्पिटलची बीले भरुन देशोधडीला लागले आहेत. अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून, केंद्र सरकारचे याकडे पुर्णपणे दुर्लक्ष असून, महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या कोणत्याही उपयाययोजना होतांना दिसत नाही. फक्त 100 कोटी लसीकरण केल्याची जाहिरातीतच मग्न आहेत. त्यांच्या सर्वसामान्यांचे कोणत्याप्रकारचे देणे-घेणे नाही. केंद्र सरकारला जागा आणण्यासाठी सायकल रॅली काढून वाढत्या महागाईचा निषेध करत आहोत, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.

     शिवसेना युवा सेनेच्यावतीने केंद्र सरकारच्या पेेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सायकल रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, हर्षवर्धन कोतकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी विरोधीपक्ष नेता संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, बबलू शिंदे, दत्ता कावरे, शाम नळकांडे, परेश लोखंडे, सुमित धेंड, नरेश भालेराव आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त असून, केंद्र सरकारकडे जनतेकडे लक्ष देण्यास वेळ नाही. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तूंचे वाढत असलेले भावामुळे नागरिकांनी जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सर्व अधिकार केंद्र सरकारने आपल्याकडे घेत असल्याने दरवाढीबाबत तेच जबाबदार आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे त्यांचा इतरही वस्तूंवर मोठा परिणाम होत असल्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवणे हे केंद्राच्या हाती आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांना दरवाढ कमी व्हावी, अपेक्षा आहे. आज राज्यात युवा सेनेच्यावतीने महागाईच्या विरोधात आंदोलन होत असल्याचे सांगितले.

     यावेळी बैलगाडी, सायकल, इलेक्ट्रीक बाईकवरुन ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत  आदिनाथ कोतकर, सागर जग्गड, स्वप्नील ठोसर, गिरीधर हंडे, अभय बडे, श्रीकांत चेमटे, प्रसन्न वाळूंजकर, मृणाल भिंगारदिवे आदि उपस्थित होते. यावेळी महागाईच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

COMMENTS