Homeताज्या बातम्या

नांदेडच्या राजकारणात मोठी खळबळ; अजित पवार गटाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, राष्ट्रवादीला धक्का

नांदेड : नांदेड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. १४ जून २०२६) शिवसेनेत

हदगाव तालुक्याच्या विविध प्रश्नांसाठी महसूलमंत्री, जलसंपदामंत्री व पालकमंत्र्यांची मंत्रालयात भेट; भागवत देवसरकर यांनी दिले निवेदन
दिल्ली दरबारातून हर्षवर्धन सपकाळांना ‘ग्रीन सिग्नल’; नांदेडमधील बंडखोरांना किमान ६ महिने प्रतीक्षेचा इशारा
नांदेडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ‘निवडक’ भेटींची जोरदार चर्चा; लोकप्रतिनिधींना डावलून गुत्तेदारांशीच जवळीक?

नांदेड : नांदेड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. १४ जून २०२६) शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हा धडक पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तब्बल २७ वर्षांहून अधिक काळ विविध पदांवर सक्रिय राहिलेले ज्येष्ठ कार्यकर्ते सर्फराज अहमद यांनीही यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सर्फराज अहमद यांचा अल्पसंख्याक समाज आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा प्रभाव असल्याने त्यांचा हा निर्णय राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्यासोबतच सय्यद बिलाल, मोहम्मद इकबाल सिद्दीकी, इंजि. देवानंद चपतराव हरतंगळे, अ‍ॅड. राजेश जाधव, गुलाबसिंह ठाकूर, अफरोज बेग आदी प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी हातावर शिवबंधन बांधले.

नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गतिमान नेतृत्वावर व विकासकामांवर विश्वास व्यक्त करत शिवसेनेसोबत काम करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. आमदार बालाजी कल्याणकर यांनी नवागतांचे पक्षात स्वागत करून, शिवसेना ही सर्वसामान्यांची चळवळ असून सर्वांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी काम केले जाईल, अशी ग्वाही दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या पक्षांतरामुळे नांदेडच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS