भारताच्या दुसर्‍या विजयाने पाकिस्तानचे धाबे दणाणले

Homeताज्या बातम्याक्रीडा

भारताच्या दुसर्‍या विजयाने पाकिस्तानचे धाबे दणाणले

आशिया कपमधून बाहेर पडण्याचा धोका

आशिया कपमध्ये जेतेपद पटकावणार्‍या संघांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर असलेला पाकिस्तानी संघ येत्या शुक्रवारी आपला तिसरा सामना खेळणार आहे. पाकिस्तान स

पाकिस्तानने क्रिकेट सामना जिंकल्यावर खाल्ला मार…आफगानिस्थानने धु धु धुतलं.
पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर विजय, फायनलमध्ये प्रवेश

आशिया कपमध्ये जेतेपद पटकावणार्‍या संघांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर असलेला पाकिस्तानी संघ येत्या शुक्रवारी आपला तिसरा सामना खेळणार आहे. पाकिस्तान संघाचा दुसरा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. पाकिस्तानला भारताविरुद्ध ५ गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. पाकिस्तानसाठी हाँगकाँग विरूद्धचा हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण इथे चूक झाली तर पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल. हाँगकाँगसमोर पाकिस्तान वरचढ ठरू शकते यात शंका नाही, पण त्यांचा माजी कर्णधार इंजमाम-उल-हकने आपल्या संघाला इशारा दिला आहे. पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर बोलताना इंजमाम म्हणाले की, पाकिस्तानने हाँगकाँगला अजिबात हलक्यात घेऊ नये इंजमाम-उल-हक म्हणाला की, टी-२० फॉरमॅटमध्ये कोणत्याही संघाला हलक्यात घेऊ नये. इंजमामच्या बोलण्यात तथ्य आहे. हाँगकाँगला टीम इंडियाविरुद्ध ४० धावांनी पराभव पत्करावा लागला पण हाँगकाँगने आपल्या खेळामुळे सर्वांना प्रभावित केले. बाबर हयातने चांगली फलंदाजी केली, तर आयुष शुक्ला, एहसान खान यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर पाकिस्तानला हार पत्करावी लागू शकते.

COMMENTS