Homeताज्या बातम्या

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’वर भीषण अपघात; तीन वाहनांची एकमेकांना धडक, सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (एक्सप्रेसवे) नव्याने सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक'वरील पुलावर तीन वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आ

किनवटमध्ये खळबळ; अवैध लाकूड तस्करांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, दुचाकी लुटून दिली जिवानीशी मारण्याची धमकी
माळशिरस तालुक्यात भीषण अपघात; मालवाहू वाहन विहिरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू, ६ गंभीर जखमी
कोपरगाव तालुक्यात वादळाचा तडाखा; ब्राह्मणगाव येथे महिला शेतकऱ्याच्या सोलर पंपाचे अतोनात नुकसान
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अपघात, तीन वाहने एकमेकांवर आदळली, वाहतूक विस्कळीत  Mumbai Marathi News | Accident on Mumbai-Pune missing link, three vehicles  collided, traffic disrupted | Latest ...

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (एक्सप्रेसवे) नव्याने सुरू झालेल्या ‘मिसिंग लिंक’वरील पुलावर तीन वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून तिन्ही गाड्या पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. मिसिंग लिंकवरील ‘केबल स्टे’ पुलाजवळ तिसऱ्या लेनवर (मार्गिकेवर) या गाड्यांमधील एक ‘फॉर्च्युनर’ कार अचानक मध्येच थांबली. त्यामुळे मागून येणारी हुंडई कंपनीची ‘वेर्ना’ कार वेगात येऊन फॉर्च्युनरवर जोरात धडकली. या धडकेनंतर वेर्ना कारने आणखी एका कारला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे, परंतु सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.

COMMENTS