Homeदेश

उत्तर प्रदेशात नवा राजकीय भूकंप? समाजवादी पक्षाचे खासदार फुटणार; मंत्री ओमप्रकाश राजभर यांचा खळबळजनक दावा

लखनऊ : उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभासपा) राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी एक

भाळवणी ग्रामपंचायतविरोधात २० जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा; सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पट्टेकर आक्रमक
नांदेड जिल्हास्तरीय ‘अस्मिता लीग’ सायकल स्पर्धा उत्साहात; ८० महिला खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
कर्जत पोलिसांची मोठी कारवाई; दरोड्याच्या गुन्ह्यातील ८ वर्षांपासून फरार आरोपी सागर भिताडे अखेर जेरबंद
ओम प्रकाश राजभर का बड़ा बयान, बिहार की सत्ता से बाहर हो जाएगी एनडीए - The  Sunday views

लखनऊ : उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभासपा) राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात (सपा) लवकरच मोठी फूट पडणार असून, पक्षाचे अनेक खासदार बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर ‘सपा’च्या एका वरिष्ठ नेत्याने पक्षातील या घडामोडींबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट पत्र पाठवल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावरील एका संदेशातून राजभर यांनी समाजवादी पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आणले. राज्यातील काही गाजलेल्या प्रकरणांमुळे ‘सपा’ नेत्यांवर कायदेशीर आणि राजकीय दबाव वाढला असून, त्यामुळे खासदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिणामी, पक्षातील अनेक प्रमुख नेते आता सत्ताधारी पक्षाकडे (भाजप) झुकत असल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्रात झालेली शिवसेना-राष्ट्रवादीतील फूट आणि पश्चिम बंगालमधील अलीकडील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत राजभर यांनी उत्तर प्रदेशातही लवकरच असेच मोठे राजकीय बदल घडतील, असे संकेत दिले. दरम्यान, समाजवादी पक्षाने राजभर यांचे हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. राजभर यांचे वक्तव्य केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी असून ते पूर्णतः तथ्यहीन आणि बिनबुडाचे असल्याची टीका ‘सपा’ नेत्यांनी केली आहे. मात्र, या विधानामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची नवी मालिका सुरू झाली आहे.

COMMENTS