Homeताज्या बातम्या

भाळवणी ग्रामपंचायतविरोधात २० जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा; सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पट्टेकर आक्रमक

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सुदाम पट्टेकर यांनी ग्रामविकासाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशा

पारनेरमध्ये विशेष मार्गदर्शन शिबीर उत्साहात; विविध शासकीय योजनांची माहिती, दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पारनेरमध्ये अवकाळीचा तडाखा; वादळी पाऊस अन् गारपिटीने टोमॅटो, आंबा बागा उद्ध्वस्त
रांजणगाव-पिंपरी गवळी येथे शिवरस्त्याच्या कामास प्रारंभ
नगर : लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे; पारिजात चौकात सुरू होते उपोषण

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सुदाम पट्टेकर यांनी ग्रामविकासाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आगामी २० जून २०२६ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील लेखी निवेदन त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सादर केले आहे.

निवेदनात पट्टेकर यांनी म्हटले आहे की, १ मे २०२६ रोजी झालेल्या भाळवणी गावाच्या जाहीर ग्रामसभेत त्यांनी गावाच्या विकासासंदर्भातील आणि नागरी सुविधांविषयी विविध महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले होते. ग्रामसभेतील या मुद्द्यांबाबत त्यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी व तोंडी पाठपुरावा करून कार्यवाहीची माहिती घेतली; मात्र अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा निर्णय घेण्यात आलेला नाही.

ग्रामविकासाच्या या गंभीर प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २० जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाहीर आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. ग्रामसभेत मांडलेल्या सर्व कायदेशीर मागण्यांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी शिवाजी पट्टेकर यांनी केली आहे.

COMMENTS