Homeताज्या बातम्या

अल-खैर फाउंडेशनचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न; 350+ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपआर्किटेक्ट अरशद, मुज्तबा फारूक आणि जज वहाब सैयद यांची प्रमुख उपस्थिती

बीड : गेल्या 8 वर्षांपासून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या बीड येथील ’अल-खैर मल्टीपर्पज फाउंडेशन’च्या वतीने शनिवारी, 13 जून

पूर्णवादी बँकेच्या मुख्य कार्यालयास आ. सुरेश धस यांची सदिच्छा भेट; बँकिंग क्षेत्रातील घडामोडींवर चर्चा
बीडच्या नितीन सोनवणे यांना शेगाव येथे राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार 2026 जाहीर
खासबाग देवी मंदिर-मोमिनपुरा बायपास मार्गावर पुलाची तातडीने उभारणीची मागणी


बीड : गेल्या 8 वर्षांपासून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या बीड येथील ’अल-खैर मल्टीपर्पज फाउंडेशन’च्या वतीने शनिवारी, 13 जून 2026 रोजी ’भव्य सत्कार सोहळा व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप’ कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. शहरातील जम-जम कॉलनी येथील सर सय्यद अहमद खान शाळेत दुपारी 2:30 वाजता आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस दलात नुकतेच निवड झालेले नवनिर्वाचित पोलीस कर्मचारी आणि 10 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमांतर्गत 350 हून अधिक अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, 6 रजिस्टर, पेन, पेन्सिल, रबर, स्केल आदी साहित्याचे संच वाटप करण्यात आले. यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमात शिक्षण, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 8 मान्यवर व त्यांच्या टीमला सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सैफ अली सर (शैक्षणिक मार्गदर्शक), आस्मा खान रईस खान (आयकोनिक जर्नलिस्ट अवॉर्ड), व्हिक्टिम शेल्टर (सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड), शेख अदिल सर (डॉ. अल्लामा इकबाल अवॉर्ड), सय्यद शम्सुल आबेदीन (मौलाना अबुल कलाम आझाद अवॉर्ड), मोमिन  रईस मोमिन नजीर (सर सय्यद ए सानी अवॉर्ड),  सौतुल इस्लाम फाउंडेशन (खिदमत-ए-इन्सानियत अवॉर्ड) यांचा समावेश आहे. तसेच, अल-खैर पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचे फिजिकल ट्रेनर डॉ. शकील सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यासोबतच महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या 8 नवनिर्वाचित उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद माननीय जज डॉ. वहाब सय्यद यांनी भूषवले. मरकझी तालीमी बोर्डाचे चेअरमन मुजतबा फारूक यांचे मार्गदर्शन3 लाभले, तर आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट डॉ. आर. अर्शद शेख यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी शेख वकील अहमद सर, मोमीन अब्दुल खालिद सर, सैयद फिरोज अली सर, मिथुन जोगदंड सर, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. जावेद साहेब, डॉ. इमरान सर आणि आशिया न्यूजचे पत्रकार समीर सर उपस्थित होते. प्रमुख वक्ते डॉ. अर्शद शेख यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलांमध्ये सर्जनशील विचार (क्रिएटिव्ह थिंकिंग) रुजवा, त्यांना खेळण्याची संधी द्या आणि उत्तम संस्कार देऊन एक चांगला माणूस घडवा. कार्यक्रमाचे अध्यक्ष जज डॉ. वहाब सय्यद यांनी पालकांना मुलांच्या मूलभूत अधिकारांविषयी माहिती दिली. कोणत्याही कठीण प्रसंगी घाबरू नका, प्रशासन आणि न्यायालय मुलांना मोफत कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी आश्वासित केले. फाउंडेशनचे अध्यक्ष इंजिनिअर अझहर इनामदार यांनी सर्वांचे स्वागत केले, उपाध्यक्ष मोमीन रजीयोदिन यांनी प्रास्ताविक केले, तर सचिव आमीर खान यांनी सूत्रसंचालन केले. अतुल केदार सर, आतिफ सय्यद, शेख रफत शाहरुख, मोहसीन करीम, वसीम खान, शाहेबाज खान, असरार भाई, अरहम साबरी, अयान भाई, बॉस ग्रुप, अल-खैर क्लिनिकचा स्टाफ आणि संपूर्ण अल-खैर टीमने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम गरजू विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरला आहे.

COMMENTS