Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जि. प. गर्ल्स ज्युनियर कॉलेज चे भव्य यश; विद्यार्थिनींची उत्कृष्ट कामगिरी

चकलांबा : जि. प. गर्ल्स ज्युनियर कॉलेज, गेवराईने बारावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत आपला शैक्षणिक दर्जा कायम राखला आहे. यावर

अभिनंदन! साक्षी शिवाजी भोसकर यांचे 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश
मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत चैतन्य आगळे तालुक्यात प्रथम  
नयना वाळके यांना ‘उत्कृष्ट मराठी अध्यापक’ पुरस्कार

चकलांबा : जि. प. गर्ल्स ज्युनियर कॉलेज, गेवराईने बारावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत आपला शैक्षणिक दर्जा कायम राखला आहे. यावर्षी एकूण 24 विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या, त्यापैकी 19 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून महाविद्यालयाचा एकूण निकाल 80 टक्के लागला आहे, तर एक विद्यार्थिनी परीक्षेला अनुपस्थित होती.
उत्तीर्ण विद्यार्थिनींपैकी 7 जणी प्रथम श्रेणीत तर 12 जणी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या, जे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे द्योतक आहे.या परीक्षेत सय्यद मसीरा अझहर आणि सायमा सरमद यांनी 68 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवले असून त्या कॉलेजमध्ये अव्वल ठरल्या. ह्याचा कॉलेज मधील सायमा सरमद या विद्यार्थिनी ने तर धार्मिक शिक्षण घेत  कॉलेज चे शिक्षण पूर्ण करून त्या मध्ये उत्कृष्ट कामगीरी करत यश संपादन केले  तसेच ह्या विद्यार्थिनी ने इस्लामिक धर्माची आलीम ही पदवी पण संपादीत केलेली आहे त्या बद्दल त्याचे विशेष अभिनंदन. यावेळी प्राचार्य विष्णू सोलंके सर, मोहम्मद इलियास सर  तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या यशाबद्दल विद्यार्थिनींना पालक, शिक्षक तसेच सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या परिश्रमांचे कौतुक केले जात आहे.

COMMENTS