Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

महानगरपालिका व पोलीस विभागाची संयुक्त धडक कारवाईमोर चौक ते छत्रपती चौक रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली

नांदेड शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी महानगरपालिकेकडून विशेष मोहिम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून उत्तर नांदेडमधील महत्त्वाचा पर्यायी

विधान परिषद निवडणूक: नांदेडच्या स्थानिक राजकारणाला नवी दिशा देणारा निकाल’मविआ’ विरुद्ध ’महायुती’च्या लढतीचे जिल्ह्यात उमटणार तीव्र पडसाद!
कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूर्तीला तडे
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामास मिळणार गती संपूर्ण कुंड तीन तासात होणार स्वच्छ : कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह



नांदेड शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी महानगरपालिकेकडून विशेष मोहिम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून उत्तर नांदेडमधील महत्त्वाचा पर्यायी मार्ग असलेल्या मोर चौक ते छत्रपती चौक या रस्त्यावर मंगळवारी संयुक्त कारवाई करण्यात आली.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथक व पोलीस प्रशासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा केला. या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने सुमारे 50 ते 60 अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली, तर 2 ट्रकभर माल जप्त करण्यात आला. काबरा नगर परिसरातील या महत्त्वाच्या रस्त्यावरची अतिक्रमणे काढण्याची मोहीम महानगरपालिका व पोलीस विभागाने संयुक्तपणे यशस्वीरीत्या पार पाडली. ही कारवाई पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, उपआयुक्त अजितपालसिंघ संधु यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईदरम्यान भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तांबे, वजिराबाद वाहतूक शाखेचे नागरगोजे, तसेच अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, पथक प्रमुख दत्ता कल्याणकर यांच्यासह महानगरपालिकेचे 30 कर्मचारी आणि पोलीस विभागातील 20 कर्मचारी सहभागी होते. महानगरपालिका प्रशासनाने नागरिक व व्यापार्‍यांना मुख्य रस्त्यांवर कोणतेही अतिक्रमण न करण्याचे आवाहन केले आहे. अतिक्रमण आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. पुढील काळातही अशी कारवाई सुरू राहणार असल्याचे उपआयुक्त अजितपालसिंघ संधु यांनी स्पष्ट केले.

COMMENTS