Homeताज्या बातम्या

माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

वडूज / प्रतिनिधी : पडळ (ता. खटाव) येथील साखर कारखान्यावर 11 मार्च रोजी झालेल्या मारहाणीत एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याप्रकरण

कडकनाथ महाघोटाळ्याच्या महारयत कंपनीच्या संचालकाला अटक
पुरंदरमधील जिल्हा बँकेस 22 कोटींचा नफा
ढगफुटी सदृश्य पावसाने पिकांचे नुकसान

वडूज / प्रतिनिधी : पडळ (ता. खटाव) येथील साखर कारखान्यावर 11 मार्च रोजी झालेल्या मारहाणीत एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी अटकेत असलेल्या विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी जामिनासाठी सत्र, जिल्हा, उच्च न्यायालयाची दारे ठोठावली. मात्र, जामीन नाकारण्यात आला होता. अखेर सोमवार, दि. 14 रोजी सर्वोच्च न्यायालयाने माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना जामीन मंजूर केला. दरम्यान, जामीन मिळाल्याचे वृत्त संपूर्ण जिल्हाभर वार्‍यांसारखे पसरले आणि खटाव तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील घार्गे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS