Homeताज्या बातम्या

धनराज पवार यांचे पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत यश

बीड : जामखेड येथील धनराज भगतसिंग पवार यांनी बी.ए. (मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम) पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केल्याबद्दल शहरासह तालुक्

जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी व बारावी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के
संजीवनी पॉलिटेक्निक ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेत प्रथम 
यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व आत्मविश्वास आवश्यक – राजकिशोर मोदीश्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडून इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव


बीड : जामखेड येथील धनराज भगतसिंग पवार यांनी बी.ए. (मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम) पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केल्याबद्दल शहरासह तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भटके-विमुक्त समाजातील धनराज पवार यांची यशोगाथा अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांच्या आईचे निधन झाले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना आणि स्वतः विवाहित असूनही अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. अनेक वेळा उदरनिर्वाहाची चिंता असतानाही त्यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर शिक्षण सुरू ठेवले. प्रतिकूल परिस्थितीतही जेष्ठांचे मार्गदर्शन, कुटुंबीयांचे सहकार्य आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी बी.ए. एम.सी.जे. परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केले.  त्यांच्या या यशामुळे समाजातील अनेक युवकांना संघर्षातून मार्ग काढण्याची प्रेरणा मिळाली आहे. धनराज पवार हे जनतेच्या मनातील लोकपत्रकार म्हणून ओळखले जातात. सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणार्‍या पवार यांची जामखेड तालुक्यासह विविध स्तरांवर लोकप्रियता दिसून येते.  त्यांनी कोणतेही यश संपादन केले की, विविध संस्था, संघटना, मित्रपरिवार आणि शुभेच्छुकांकडून त्यांच्या सत्कारांचा अक्षरशः वर्षाव होतो. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सामाजिक,शैक्षणिक, राजकीय ,आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान, क्रीडा आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जिद्द असेल तर मार्ग सापडतो,परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, चिकाटी, मेहनत आणि जेष्ठांचे मार्गदर्शन असेल तर यश मिळविता येते. शिक्षण हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे.
– धनराज पवार

COMMENTS