Homeताज्या बातम्या

आयएएस तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची धास्ती? बीडमधील अनेक नामांकित हॉटेल्सचे शटर बंद

बीड : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे,

शेगावच्या प्रसिद्ध कचोरी केंद्रावर एफडीएचा (FDA) छापा; कच्च्या मालाचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत पाठवले
तामश्यात केवळ ‘तुकाराम मुंडे’ यांच्या नावाची अफवा; अन्‌ धास्तीने बंद झाली दुकाने व पानटपऱ्या!
सोनईत अन्न सुरक्षा विभाग व पोलिसांची मोठी कारवाई; ५३ हजारांचा बेकायदेशीर सुगंधी तंबाखूचा साठा जप्त
Beed News : बस्स नाम ही काफी है! तुकाराम मुंढेंची दहशत; दौऱ्याच्या चर्चेने  दुकानदारांना भरली धडकी, काय केलं?

बीड : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, गुटखा विक्री आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्यांच्या या धडक मोहिमेमुळे राज्यातील खाद्य व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून बीड जिल्ह्यातील अनेक नामांकित हॉटेल्स, ढाबे, बेकरी आणि खाद्यपदार्थ विक्रीची आस्थापने काही दिवसांपासून बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे.

तुकाराम मुंढे यांनी आपल्या कारकिर्दीत ज्या ज्या विभागात काम केले, तेथे शिस्त आणि नियमांचे काटेकोर पालन यावरच भर दिला आहे. एफडीएची जबाबदारी स्वीकारताच त्यांनी राज्यभरात छापेमारी करत दूध भेसळ, बनावट खवा आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील व्यवसायिकांमध्येही तपासणीची तीव्र धास्ती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. बीड शहरातील काही मोठी हॉटेल्स अचानक बंद झाल्याने नागरिकांचे लक्ष याकडे वेधले गेले आहे.

दरम्यान, जर सर्व व्यवहार नियमांनुसार कायदेशीर सुरू आहेत, तर हॉटेल्स अचानक बंद का? असा सवाल आता सामान्य ग्राहकांमधून उपस्थित केला जात आहे. मात्र, हॉटेल्स बंद राहण्यामागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या समोर आलेले नाही. त्यामुळे ही आस्थापने नियमांचे उल्लंघन करत होती, असा थेट निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे जाणकारांचे मत आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून दिला जात असून आगामी काळात बीड जिल्ह्यात तपासणी मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

COMMENTS