Homeताज्या बातम्यासंपादकीय

नितीश कुमार यांची आक्रमक रणनीती ! 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे गेल्या काही दिवसांपासून शांत असल्याचे जाणवत असतानाच, आज अचानक त्यांनी बिहारच्या एका वैद्यकीय महाविद्यालय कम रु

तामिळनाडू प्रपोगंडामागचे खलत्त्व ! 
पवन खेरा अटकेचा अन्वयार्थ ! 
ब्राझीलचा सत्ता संघर्ष ! 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे गेल्या काही दिवसांपासून शांत असल्याचे जाणवत असतानाच, आज अचानक त्यांनी बिहारच्या एका वैद्यकीय महाविद्यालय कम रुग्णालयाचे उद्घाटन करताना आक्रमक राजकीय वक्तव्य करून २०२४ मधल्या राजकीय संघर्षाचे बिगुलच वाजवले आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील राहुई या तालुक्यातील भागमबिगहा येथील चारशे दहा कोटींची लागत असलेल्या एका डेंटल महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना, या पुढील काळात आता लढाई कोणत्याही राजकीय पक्षासोबत नसून थेट नागपूरच्या मुख्यालयाशी असल्याचे त्यांनी आपल्या जाहीर भाषणातून सांगितले. यावेळी तेजस्वी यादव हे देखील मंचावर उपस्थित होते. नितीश कुमार यांच्या बोलण्याच्या धाग्याला पकडूनच तेजस्वी यादव यांनी नागपूर मुख्यालयातून देशात धार्मिक द्वेष पसरविला जात असल्याचे सांगून, यापुढील थेट संघर्ष इतर कोणाशी नसून नागपूरशी असणार, असा दुजोरा त्यांनी यावेळी दिला. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती तोडल्यानंतर लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर युती केली. यानंतर देशभरात त्यांच्याकडे २०२४ च्या भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. परंतु गेली काही महिने राजकीय आघाडीवर ते शांत होते. दरम्यानच्या काळात निवडणूक स्ट्रॅट्रेजिस्ट प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये पक्ष स्थापन करून आपल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी थेट बिहारच्या जनतेपर्यंत आपला कार्यक्रम नेलेला आहे. यातून प्रशांत किशोर दोन बाबी ठासून लोकांच्या मनावर बिंबवत आहेत की, बिहार सारख्या राज्यात खासदारांची ४० पदे आहेत, तर गुजरात या राज्यात केवळ वीस खासदार आहेत. परंतु संपूर्ण बिहारची जनता वीस खासदारांच्या राज्यात अक्षरशः मजूर म्हणून कार्यरत असल्याचा प्रचार प्रसार ते करीत आहेत. प्रशांत किशोर हे निवडणूक स्ट्रॅट्रेजिस्ट असतानाही थेट राजकीय पक्ष स्थापन करून बिहारमध्ये आपल्या पक्षाचा जनतळ उभा करण्यासाठी मैदानात उतरले आहेत अशावेळी त्यांना उत्तर न देता नितिश कुमार यांनी त्यांच्या मागे नागपूर मुख्यालयाची शक्ती आहे असे गृहीत धरून आपला २०२४ मधला मुकाबला हा नागपूरशी असणार आहे, असे जाहीर करून प्रशांत किशोर यांच्या स्ट्रॅटेजीला पहिल्या टप्प्यातच बाद करण्याचे ठरवलेलं असल्याचे दिसते. गेली पंचवीस वर्ष नितीश कुमार हे आपल्या स्ट्रॅटेजीने राजकारणात केवळ टिकून नाहीत, तर सत्ताकारणात ते मजबूत झालेले आहेत. त्यामुळे त्यांची स्ट्रॅट्रेजी ते जाहीर करतात, तेव्हा त्याचा परिणाम हा केवळ राज्यापुरता मर्यादित राहत नाही; तर ती अखिल भारतीय स्ट्रॅटेजी म्हणून राजकीय पक्षांकडून स्वीकार्य होत जाते, असा त्यांच्या राजकारणाचा आजपर्यंत अनुभव राहिलेला आहे. बिहारच्या राजकारणात त लालूप्रसाद यादव आणि नितेश कुमार या समाजवादी विचारांची आणि ओबीसी नेतृत्वाची गेली ४० वर्ष राजकारणातील आघाडी कोणत्याही राजकीय पक्षाला मोडून काढता आलेली नाही. अर्थात आलो प्रसाद यादव आणि नितिश कुमार हे दोन्हीही राम मनोहर लोहिया यांच्या चळवळीपासून कार्यकर्ते म्हणून बिहारच्या राजकारणात पुढे आले. परंतु, कालांतराने याच नेत्यांमध्ये मतभेद झाले आणि गेली २५ वर्ष त्यांच्यामध्ये या नात्या प्रकारे वितुष्ट येत राहिले. त्याचा परिणाम बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने नितीश कुमार यांच्याशी युती करून आपली सत्ता टिकवली. परंतु, आता राजकारणाचे वळण बदलले असून बिहार च्या राजकारणाचा प्रभाव आता राष्ट्रीय राजकारणावर पडणार आहे!

COMMENTS