Homeताज्या बातम्या

कर्जमाफी आणि पीकविमा प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे किसान सभेला आश्वासन

बीड : कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द करणे, पीकविमा योजनेतील रद्द केलेले ट्रिगर पुन्हा लागू करणे, देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क देणे आ

 कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे राज्यभर आंदोलनआज कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देणार  
कर्जमाफी शासन आदेशाची अकोलेत होळी; किसान सभेचे राज्यव्यापी आंदोलन
कर्जमाफीच्या अटींविरोधात किसान सभेचे राज्यभर तीव्र आंदोलन; आज पुणे येथे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना देणार निवेदन

बीड : कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द करणे, पीकविमा योजनेतील रद्द केलेले ट्रिगर पुन्हा लागू करणे, देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क देणे आणि पेसा मोबिलायझर पदे रद्द करण्याचा निर्णय मागे घेणे या प्रमुख मागण्यांसाठी राज्य किसान सभेच्या शिष्टमंडळाने राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. पुणे येथे झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत कृषिमंत्र्यांनी पीकविमा संदर्भातील ट्रिगर व १७,५०० रुपयांच्या विमा भरपाईबाबत सकारात्मक भूमिका घेत हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

किसान सभेने आरोप केला आहे की, सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी व शर्तींमुळे सुमारे १२ लाख ७१ हजार शेतकरी आणि नियमित कर्जफेड करणारे २३ लाख ७३ हजार शेतकरी प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. शासनाचा ५६ लाख लाभार्थ्यांचा दावा असला तरी जाचक अटींमुळे ही संख्या घटणार असल्याचे संघटनेने म्हटले. सन २०२५ मधील अतिवृष्टीचे झालेले नुकसान पाहता कर्जमाफीवर निर्बंध लादणे अन्यायकारक आहे.

यावेळी शिष्टमंडळाने पीककर्जासोबतच शेती अवजारे, सिंचन, कुक्कुटपालन, पॉलिहाऊस यासाठी घेतलेले कर्ज तसेच सोनेतारण व मायक्रोफायनान्स कर्जही माफ करण्याची मागणी केली. या बैठकीत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, प्रा. अजित अभ्यंकर, उमेश देशमुख, अमोल वाघमारे, अ‍ॅड. अजय बुरांडे, उद्धव पौळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा किसान सभेने दिला आहे.

COMMENTS