Homeताज्या बातम्या

बीडमध्ये १६ जूनपासून १० दिवसीय विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मिळणार तंत्रशुद्ध धडे

बीड : जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करणे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण

नेकनूर अप्पर तहसील कार्यालयात लिंबागणेश मंडळाचा समावेश करण्यास ग्रामस्थांचा विरोध; हरकत नोंदविण्याचा निर्धार
मुस्कान शेख व छाया पांचाळ प्रसुती दरम्यान मातामृत्यू प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! बीड जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन
बीड जिल्ह्यात असंघटित क्षेत्र आणि श्रमशक्ती सर्वेक्षणाचा शुभारंभ; खरी माहिती देऊन राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
शिपायाच्या भरवशावर बीड जिल्हा क्रीडा कार्यालय Beed Marathi News | Beed  District Sports Office on the reliance of the Shiite | Latest Beed News at  Lokmat.com

बीड : जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करणे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने बीडमध्ये एका विशेष क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य, पुणे) अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र (बीड) यांच्या संयुक्त विद्यमाने सॉफ्टबॉल, बेसबॉल व मैदानी खेळांच्या या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली.

हे शिबिर दि. १६ ते २५ जून २०२६ या १० दिवसांच्या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बीड येथे संपन्न होणार आहे. खेळाडूंच्या सोयीसाठी दररोज सकाळी ६ ते ९:३० आणि दुपारी ४:३० ते संध्याकाळी ७ अशा दोन सत्रांमध्ये हे प्रशिक्षण दिले जाईल. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मैदानी प्रशिक्षणासोबतच खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष समुपदेशन व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवछत्रपती पुरस्कारार्थी नं. पो. शेळके खेळाडूंना खेळाविषयी सखोल माहिती देतील, तर गुणवंत क्रीडा मार्गदर्शक अविनाश बारगजे हे क्रीडा क्षेत्रातील संधी व करिअर याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीमती राधा तांबे या योगसाधनेच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीचे धडे देतील. तसेच, खेळातील दुखापतींवर मार्गदर्शनासाठी डॉ. कुलदीप शहाणे आणि योग्य आहाराविषयी माहिती देण्यासाठी आहारतज्ज्ञ डॉ. सूरज कोकणे उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात सॉफ्टबॉलसाठी सतीश राठोड, बेसबॉलसाठी रेवननाथ शेलार आणि मैदानी खेळांसाठी अविनाश पाटील हे तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देतील. शिबिरात नाव नोंदणीसाठी खेळाडूंनी सतीश राठोड (९९२३०१९३५३), रेवननाथ शेलार (९०७५४७६७५१) किंवा अविनाश पाटील (९६२३७८११२१) यांच्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन क्रीडा विभागाने केले आहे.

COMMENTS