Homeताज्या बातम्या

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारतीय लष्कराच्या नेतृत्वात महत्त्वाचा बदल जाहीर केला असून विद्यमान उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची पुढील

मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा; ‘सारथी’ला ३५ कोटींहून अधिक निधी मंजूर
विधानपरिषदेसाठी महायुतीकडून १७ अधिकृत उमेदवार जाहीर
साईनाथ महाराजांमुळे लोकसेवेची प्रेरणा मिळते; परभणीचे आमदार राहुल पाटील यांचे प्रतिपादन
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख

नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारतीय लष्कराच्या नेतृत्वात महत्त्वाचा बदल जाहीर केला असून विद्यमान उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. ३० जून २०२६ रोजी दुपारनंतर त्यांची नियुक्ती प्रभावी होणार असून विद्यमान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या निवृत्तीनंतर ते पदभार स्वीकारतील.

पुणे जिल्ह्यातील खडकावासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीचे (NDA) माजी विद्यार्थी असलेले लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांना डिसेंबर १९८६ मध्ये रणगाडा दलात (Armoured Corps) अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली होती. जवळपास चार दशकांच्या प्रदीर्घ सैन्य सेवेत त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. युद्धसज्जता वाढवणे, सैन्यदलाची क्षमता विकसित करणे आणि दीर्घकालीन परिवर्तनात्मक उपक्रम राबवणे या क्षेत्रांत त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. त्यांनी वाळवंटी भागातील रणगाडा तुकडी, पश्चिम सीमावर्ती क्षेत्रातील रणगाडा ब्रिगेड तसेच जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी दलाचे नेतृत्व केले आहे.

लेफ्टनंट जनरल पदावर असताना त्यांनी भारतीय लष्करातील महत्त्वाच्या प्रहारक दलांपैकी एक असलेल्या “सुदर्शन चक्र” दलाची धुरा सांभाळली. त्यानंतर दिल्ली क्षेत्राचे प्रमुख म्हणून कार्य करताना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक लष्करी उपक्रमांचे नेतृत्व त्यांनी केले. धीरज सेठ यांना दक्षिण-पश्चिम तसेच दक्षिण कमांड या दोन महत्त्वाच्या लष्करी विभागांचे नेतृत्व करण्याचा दुर्मिळ सन्मान लाभला आहे. सैन्य नियोजन, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भविष्यातील गरजांनुसार क्षमता वृद्धी यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतही त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. दीर्घकालीन सैन्य आराखडा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि भविष्यातील युद्धस्थिती लक्षात घेऊन आवश्यक बदल घडवून आणण्याच्या कामात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

COMMENTS