Homeताज्या बातम्या

मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा; ‘सारथी’ला ३५ कोटींहून अधिक निधी मंजूर

पुणे : राज्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व

‘मृग नक्षत्र केवळ सुरुवात, शेतकऱ्यांनी धीर सोडू नका’ – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
एकनाथ खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर; भुसावळ न्यायालयाचा मोठा दिलासा
सोलापूर येथील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी बीडचे कुमार व मुलींचे संघ रवाना

पुणे : राज्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांना ३५ कोटी ३४ लाख २३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या भरीव निधीमुळे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि विविध शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीला मोठी गती मिळणार आहे.

नियोजन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार (GR), आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, रोजगार आणि प्रशासकीय सेवांमध्ये अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निधी देण्यात आला आहे. पुण्यातील ‘सारथी’ संस्था मराठा समाजातील युवक-युवतींना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेमार्फत विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन, प्रशिक्षण, शिष्यवृत्ती योजना, संशोधन प्रकल्प आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जातात. यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना या संस्थेचा लाभ होत आहे.

शासनाने मंजूर केलेला हा निधी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी राखीव असलेल्या तरतुदीतून देण्यात येणार आहे. या रक्कमेतून विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजनांचा विस्तार करण्यात येणार असून प्रशिक्षण सुविधाही अधिक बळकट केल्या जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील काही कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ‘सारथी’ला मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

COMMENTS