नांदेड : परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी श्रीक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्त धाम आश्रम येथे भेट देऊन आदरणीय साईनाथ महाराज वसमतकर यांचे दर्शन घ

नांदेड : परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी श्रीक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्त धाम आश्रम येथे भेट देऊन आदरणीय साईनाथ महाराज वसमतकर यांचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला. धोंड्याच्या (अधिक) महिन्यानिमित्त आश्रमात मोठ्या प्रमाणात महाप्रसाद महापंगतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना आमदार राहुल पाटील म्हणाले की, “मी वेळोवेळी श्री साईनाथ महाराजांची भेट घेऊन दर्शन घेत असतो. त्यांच्या संगतीत राहिल्याने मला लोकसेवेची मोठी प्रेरणा मिळते.” माहूर गडावरील श्री आनंद दत्त धाम आश्रम येथे दरवर्षी धोंड्याच्या महिन्यात महाअन्नदान व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या कालावधीत लाखो भाविक आश्रमाला भेट देऊन अन्नदानाचा लाभ घेतात. विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व भाविक येथे येऊन साईनाथ महाराजांच्या सप्तसूत्री कार्यक्रमाचा अनुभव घेतात.
साईनाथ महाराजांच्या कार्याची दखल शासनाने घेतली असून, त्यांची आयटीआयच्या (ITI) प्रमुख मार्गदर्शक ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सप्तसूत्री कार्यक्रमाची व्याप्ती देशातील अनेक राज्यांपर्यंत पोहोचली आहे. या भेटीदरम्यान अरविंद काका देशमुख, बंडू नाना बिडकर (सरपंच, वाडी, जि. परभणी), प्रल्हादराव देवडे, सुनील गुडघे यांच्यासह माहूर शहर व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एस. पाटील यांनी केले, तर आभार विनोद भारती यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

COMMENTS