Homeताज्या बातम्या

कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार ठाम; आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रकृती खालावली

पंढरपूर : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी सरकारविरोधातील भूमि

‘कॉकरोच जनता पार्टी’ला अण्णा हजारेंचे समर्थन; तरुणांच्या भावना समजून घेण्याचा सरकारला सल्ला
परळीत एलसीबीचा धडाकेबाज छापा; २६ किलो गांजासह ७.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त
ज्येष्ठ समाजसेवक भीमरावजी दुधारे यांचे हृदयविकाराने निधन; भोकर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात शोककळा
पंढरपुरात अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस, रोहित पवार सरसकट कर्जमाफीवर ठाम |  Saamana (सामना)

पंढरपूर : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी सरकारविरोधातील भूमिका अधिक तीव्र केली. कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत विनाअट कर्जमाफी जाहीर होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

अन्नत्याग आंदोलनादरम्यान रोहित पवार यांची प्रकृती काहीशी खालावल्याची माहिती समोर आली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) घटल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत असून वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. कुटुंबीयांना या आंदोलनामुळे भावनिक ताण सहन करावा लागत असल्याचे सांगताना त्यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचे नमूद केले.

COMMENTS