Homeताज्या बातम्या

तामश्यात केवळ ‘तुकाराम मुंडे’ यांच्या नावाची अफवा; अन्‌ धास्तीने बंद झाली दुकाने व पानटपऱ्या!

तामसा : तामसा शहरात मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाचे पथक दाखल झाल्याची केवळ एक अफवा पसरली आणि पाहता पाहता शहरातील सर्व पानटपऱ्या अचानक बंद झाल्या.

सहा महिन्यांपासून वेतन रखडल्याने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कर्मचार्‍यांचे असहकार आंदोलन; कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ
मराठा आरक्षणावर समाधानकारक काम सुरू; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा
विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत नाराजीनाट्य; ठाण्याच्या जागेसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा चर्चेत
तुकाराम मुंढे केवळ 'या' 3 राजकीय नेत्यांनाच ट्विटरवर करतात 'फॉलो' - Marathi  News | Tukaram Mundhe only follows these 3 political leaders on Twitter |  Latest National News at Lokmat.com

तामसा : तामसा शहरात मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाचे पथक दाखल झाल्याची केवळ एक अफवा पसरली आणि पाहता पाहता शहरातील सर्व पानटपऱ्या अचानक बंद झाल्या. या अफवेमुळे किराणा दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते आणि गुटखा विक्रेत्यांची एकच धावपळ उडाली. काहींनी दुकानातील भेसळयुक्त पदार्थांची लपवाछपवी केली, तर काहींनी गुटख्याचे मोठे साठे इतरत्र हलविल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.

प्रत्यक्षात शहरात कोणतेही पथक आले नव्हते की कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नावाच्या केवळ एका अफवेने अवैध धंदे चालकांची अक्षरशः झोप उडवली. जर सर्व काही नियमाप्रमाणे आणि कायदेशीर सुरू असेल, तर केवळ एका अफवेने एवढी धास्ती का? असा सवाल आता उपस्थित होत असून, या प्रकारामुळे तामसा शहरातील अवैध धंद्यांचे वास्तव चव्हाट्यावर आले आहे.

तामसा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआम गुटखा विक्री, खाद्यतेलातील भेसळ, उघड्यावरील अन्नपदार्थ, केमिकलयुक्त फळे तसेच भेसळयुक्त दही-दूध-खवा विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या घटकांवर अन्न व औषध प्रशासनाकडून मात्र कोणतीही प्रभावी किंवा सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. केवळ अफवेने एवढी खळबळ उडू शकते, तर प्रत्यक्ष छापेमारी झाली तर किती मोठे सत्य समोर येईल? असा प्रश्न आता तामसावासीयांना पडला आहे. अन्न व औषध प्रशासनाने आता तामश्यात विशेष मोहीम राबवून सखोल तपासणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

COMMENTS