नांदेड : विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नांदेड दौऱ्यान

नांदेड : विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नांदेड दौऱ्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला आणि चर्चांना तोंड फोडले आहे. पक्ष संघटनेतील ज्येष्ठ पदाधिकारी, विद्यमान खासदार, आमदार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना भेटण्यापेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित काही खाजगी गुत्तेदार (कंत्राटदार) आणि निवडक व्यक्तींशी झालेल्या गुप्त बैठकींमुळे भाजपात अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
रवींद्र चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर आले असताना त्यांनी शहरातील एका स्वीकृत नगरसेवकाच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित एका मोठ्या खाजगी गुत्तेदाराच्या घरी जाऊन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या संपूर्ण दौऱ्यात भाजपचे विद्यमान खासदार, आमदार, माजी लोकप्रतिनिधी किंवा पक्षाच्या जुन्या स्थानिक नेतृत्वाशी कोणतीही विशेष बैठक अथवा संवाद झाल्याचे दिसून आले नाही.
विधान परिषद निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या राजकीय टप्प्यावर प्रदेशाध्यक्षांचा भर संघटनात्मक मजबुतीवर असणे अपेक्षित असताना, स्थानिक नेत्यांना वगळून काही मोजक्याच व्यक्तींना प्राधान्य दिले गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रीपद सांभाळलेल्या रवींद्र चव्हाण यांच्या या कंत्राटदारकेंद्री भेटी केवळ शिष्टाचाराच्या होत्या की त्यामागे काही वेगळी राजकीय-आर्थिक समीकरणे आहेत, याबाबत नांदेडच्या राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क रंगू लागले आहेत.

COMMENTS