Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी खेंडके 

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांच्या मंदिरामध्ये आगामी शिव जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये स

‘परिक्रमा’मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
शैक्षणिक चळवळीचा वारसा जपण्यासाठी एकत्र येण्याची गरज : भोस 
श्रीगोंदा-टाकळी कडेवळीत रस्ता दुरुस्त करा

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांच्या मंदिरामध्ये आगामी शिव जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्ष पदी मीरा खेंडके यांची निवड झाली. तसेच उपाध्यक्ष पदी चेतना मांगडे, सचिव पदी सुनील ढवळे, खजिनदार पदी बालूदादा मखरे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

 यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष मीरा खेंडके आणि पदाधिकारी तसेच नगरसेवक श्रीकृष्ण धुमाळ, सोनूदादा कोथिंबीरे, अनिल महाराज औटी यांचा सन्मान सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे मावळते अध्यक्ष बालूदादा मखरे यांनी केला. बैठकीचे प्रास्ताविक अरविंद कापसे यांनी तर आभार बालूदादा मखरे यांनी मानले.

यावेळी माजी नगरसेवक सतीश मखरे, नितीन सोनवणे, आप्पासाहेब सोनवणे, रमण सोनवणे, अर्जुन सोनवणे, राजाभाऊ जगताप, शिवाजी शेळके यांच्यासह सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे सदस्य अरविंद कापसे, राजेंद्र राऊत, नाना शिंदे, दिपक मखरे, आजीज शेख, गणेश पारे, दिलीप लबडे इंजि. शाम जरे आदि उपस्थित होते.

 सदरील बैठकीचे प्रास्ताविक करताना अरविंद कापसे यांनी सांगितले की, आगामी शिवजयंती उत्सव सालाबाद प्रमाणे भव्य दिव्य होणार आहे. शिव प्रतिमा पूजन आणि पालखी मिरवणूक मॅरेथॉन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, छत्रपती बाईक रॅली, ढोल पथक, लेझीम पथक, झांज पथक, शिवकालीन शस्त्र विद्या, कराटे प्रात्यक्षिक, सांस्कृतिक कार्यक्रमासह महात्मा फुले सर्कल येथे दीपोत्सव अशी कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सर्व नेते, पदाधिकारी, तमाम शिवप्रेमी उपस्थित राहणार असल्याची माहिती अरविंद कापसे यांनी यावेळी दिली.

COMMENTS