Homeताज्या बातम्या

वीजप्रश्नांवर आमदार सुरेश धस आक्रमक; महावितरणला तातडीने उपाययोजनांचे अल्टिमेटम

आष्टी विधानसभा मतदारसंघातील वाढत्या वीज समस्यांवर आ. सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत थेट लातूर येथील महावितरण परिमंडळ कार्यालयात धडक दिली. शेतकर

बाळेवाडी गावामध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार हेच उद्दिष्ट
कासारी येथे कृषी कन्यांचे आगमन; ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाला सुरुवात
नाम फाउंडेशनच्या वॉटर एटीएममुळे १२ गावांना स्वच्छ पाण्याचा दिलासा; ७५ लाखांचा प्रकल्प



आष्टी विधानसभा मतदारसंघातील वाढत्या वीज समस्यांवर आ. सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत थेट लातूर येथील महावितरण परिमंडळ कार्यालयात धडक दिली. शेतकर्‍यांच्या वीजपुरवठ्याशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची स्पष्ट मागणी त्यांनी महावितरण च्या अधिकार्‍यांसमोर केली.
मुख्य अभियंता श्री. बुलबुले यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार धस यांनी मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या अडचणी, अपुरा वीजपुरवठा, कमी दाबाची वीज आणि अपूर्ण प्रकल्प याकडे लक्ष वेधले. आष्टी तालुक्यातील दादेगाव, बीडसांगवी तसेच पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे मंजूर झालेली 33/11 केव्ही उपकेंद्रे तातडीने पूर्ण करून कार्यान्वित करावीत, अशी ठाम मागणी त्यांनी केली. या उपकेंद्रांमुळे परिसरातील शेतकर्‍यांना भेडसावणारा कमी दाबाचा वीजपुरवठा आणि वारंवार होणारी खंडित वीजपुरवठा समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे त्यांनी नमूद केले. आष्टा हरिनारायण व पोखरी येथील सबस्टेशनवर मंजूर 5 एमव्हीए ट्रान्सफॉर्मर तातडीने बसवण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय ईडीबी योजनेअंतर्गत63 केव्हीए ऐवजी 100 केव्हीए आणि 200 केव्हीए क्षमतेची रोहित्रे उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला. वाढत्या वीज मागणीचा विचार करून वितरण व्यवस्था सक्षम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सौर कृषी पंप योजनेत विद्युत क्षमता आणि पाण्याचा दाब यामध्ये समतोल राखण्याची आवश्यकता असल्याचे आमदार धस यांनी सांगितले. योग्य तांत्रिक नियोजन न झाल्यास भविष्यात शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. महावितरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, महापारेषण विभागाचे अधिकारी तसेच सौर पंप योजनेचे प्रमुख यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या बैठकीत सर्व प्रलंबित वीज प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला. आष्टी मतदारसंघात जलसंधारण प्रकल्प, शेततळे आणि विहिरींमुळे सिंचन क्षमता वाढली असून, त्यासाठी उच्च दाबाचा आणि अखंड वीजपुरवठा अत्यावश्यक असल्याचे आमदार धस यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांच्या विकासासाठी आणि सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार असून कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

COMMENTS