बीड : दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून योगाचे महत्त्व अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि निरोगी जीवनश

बीड : दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून योगाचे महत्त्व अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजात रुजावा, या उद्देशाने योग शिक्षिका राधा तांबे यांच्यावतीने 15 जून ते 20 जून या कालावधीत पाच दिवसांच्या मोफत ऑनलाइन योग वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाढता तणाव, बदलती जीवनशैली आणि विविध आरोग्य समस्या लक्षात घेता योगाची गरज अधिक महत्त्वाची ठरत आहे. या वेबिनारमध्ये योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे फायदे, दैनंदिन जीवनात योगाचा समावेश कसा करावा, तसेच प्राणायाम, ध्यान आणि विविध योगासनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ऑनलाइन स्वरूपात होणार्या या वेबिनारमध्ये विद्यार्थी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना घरबसल्या सहभागी होता येणार आहे. जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, तसेच आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारालाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहन राधा तांबे यांनी केले आहे. वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 9765410044 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS