धनंजय मुंडे रात्री उशिरा ’सागर’ बंगल्यावर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनंजय मुंडे रात्री उशिरा ’सागर’ बंगल्यावर

देवेंद्र फडणवीसांशी अर्धा तास चर्चा केल्याने तर्क-वितर्कांना उधाण

मुंबई ः राज्यातील सत्तानाटय संपुष्टात आले असले तरी त्यातील ट्विस्ट मात्र अजूनही तसाच आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यानंतर भा

विकासकामांना स्थगिती देण्यास नकार मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय 
गिरीशचं रडणं अजून बंदच होईना : अजितदादांची टोलेबाजी
‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’ ला वामनदादा कर्डक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मुंबई ः राज्यातील सत्तानाटय संपुष्टात आले असले तरी त्यातील ट्विस्ट मात्र अजूनही तसाच आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाचं पालन करत देवेंद्र फडणवीसही मंत्रिमंडळात सहभागी झाले.देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुरुवारीच्या घडलेल्या राजकीय ट्विस्टमुळे सगळ्याच नेत्यांना धक्का बसला. भाजपाच्या स्थानिक नेत्यांसह कुणालाही शिंदे मुख्यमंत्री बनतील याची कल्पना नव्हती. मात्र त्यानंतर मध्यरात्री धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे तर्क-तिर्कांना उधाण आले आहे.
धनंजय मुंडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. 2019 मध्ये जेव्हा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी सोहळा पार पडला. तेव्हा धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल होते. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपात असताना कायम एकत्र राहिले आहेत. त्यांचे संबंध चांगले आहेत. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते आहेत. सदिच्छा भेट म्हणून धनंजय मुंडे घेतले असतील. शुभेच्छा देण्यासाठी मुंडे गेले असतील असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले. धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास अर्धा तास भेट झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आली नाही. मात्र रात्री साडेबारा वाजता धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेतली. सध्याच्या राजकीय घडामोडीत या भेटीला विशेष महत्त्व आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे मविआ सरकार कोसळलं आहे. तर सुरुवातीला यात कुठेही भाजपाचा हात आहे असं दिसत नाही असं विधान अजित पवारांनी केले होते. राज्यातील सत्तानाट्यावर आक्रमक भाष्य करणंही अजितदादांनी टाळलं. त्यात धनंजय मुंडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे नेमकं पडद्यामागे काय सुरू आहे याचं उत्तर आगामी दिवसात सगळ्यांसमोर येऊ शकते.

COMMENTS