Homeताज्या बातम्या

‘देऊळ बंद २’ चा बॉक्स ऑफिसवर धडाका; २० दिवसांत ६२ कोटींची कमाई करत मोडला ‘वेड’चा रेकॉर्ड

मुंबई : प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद २' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. २१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रप

नेतृत्वबदलाने काय साध्य होणार?
देवेंद्र फडणवीस : प्रशासकीय कार्यक्षमता आणि गतिमान निर्णयप्रक्रियेचे दूरदृष्टी नेतृत्व!
तनपुरेंच्या प्रवेशामागे विकासाचे राजकारण की राजकारणाचा विकास? राहुरीच्या सत्तेच्या पटावर नवी समीकरणे

मुंबई : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. २१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या २० दिवसांत तब्बल ६२ कोटी रुपयांची नेट कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम रचला आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाने रितेश देशमुखच्या सुपरहिट ‘वेड’ चित्रपटाची कमाई मागे टाकत सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. स्नेहल तरडे, मोहन जोशी यांच्यासह दमदार कलाकारांची फौज असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

COMMENTS