कोपरगाव शिवसेनेकडून तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कोपरगाव शिवसेनेकडून तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव निमित्त कोपरगाव शिवसेनेकडून कारोनाचे सर्व नियम व अटी पाळून पहाटे सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पाच जोडप्यांच्या हस्ते महामस्तक अभिषेक करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

खोदकामात सापडला 1098 कॅरेट मोठा हिरा LokNews24
औषधे पुरवणे ठेक्याच्या आमीषाने 31 लाख रुपयांची केली फसवणूक
देवगाव शिवारात तरुणाचा खून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कोपरगाव शहर प्रतिनिधी- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव निमित्त कोपरगाव शिवसेनेकडून कारोनाचे सर्व नियम व अटी पाळून पहाटे सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पाच जोडप्यांच्या हस्ते महामस्तक अभिषेक करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
दरवर्षी कोपरगाव येथील शिवजयंती म्हटले की सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. सांस्कृतिक कार्यक्रम, शिवव्याख्यान, मिरवणूक,मर्दानी खेळ आदी कार्यक्रम घेण्यात येतात. परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे फक्त ५० जणांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याचे परवानगी शासनाने दिलेली होती. त्यामुळे इतर सर्व कार्यक्रम रद्द करून कोपरगाव शिवसेनेकडून कोपरगाव शहर पोलीसांना मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच पोलिसांच्या कारवाईत जे नागरिक विना मास्क आढळून येतील त्यांच्यासाठी देखील अतिरिक्त मास्क कोपरगाव शहर पोलीस स्टेशन कडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी राजेश्वरी होने या चिमुकल्या मुलीने छत्रपती शिवरायांवर अतिशय सुंदर शब्दात भाषण करून सर्वांचे लक्ष वेधले व शाबासकी मिळवली. कोपरगाव नगरीचे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते. 
तसेच रिक्षा स्टँड येथे छ.शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिस्त पुतळ्याला फुलांची आरास करून अतिशय सुंदर पद्धतीने सजविण्यात आले. यावेळी शिवसेना उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, विधानसभा संघटक अस्लमभाई शेख,युवासेना सहसचिव सुनील तिवारी,बाळासाहेब जाधव, दिलीप अरगडे,दिलीप सोनवणे, उपशहरप्रमुख प्रफुल्ल शिंगाडे,विकास शर्मा,गगन हाडा,युवा नेते विक्रांत झावरे,शिंगणापूर  गणप्रमुख नितीन शिंदे,शहर संघटक बाळासाहेब साळुंके,नितीन राऊत विभागप्रमुख राहुल हंस्वाल, वाहतूकसेना तालुकाप्रमुख पप्पू पेकळे,उपतालुकाप्रमुख अविनाश धोक्रट, किरण कुऱ्हे,राकेश वाघ,जाफर सय्यद,सतीश शिंगाणे,अविनाश वाघ, बंटी बाविस्कर,अंबादास वाघ,प्रवीण शेलार,अशोक पवार,उमेश छुगानी, सतीश खर्डे,भूषण वडांगळे,विशाल झावरे,वेदांत कर्पे,दिपक राजपूत,गणेश साळुंके,ओम साळुंके,पिंटू पावशे, नगरसेविका वर्षाताई शिंगाडे, महिला आघाडी उपशहरप्रमुख अश्विनी होने, तनुजा शिलेदार आदी शिवसैनिक उपस्थित होते.

COMMENTS