Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गायत्री रामनाथ जवादे संस्कृत परीक्षेत प्रथम

भातकुडगाव फाटा प्रतिनिधी ः समाजभूषण आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगावची विद्यार्थिनी कु.गायत्री रामनाथ जवादे ही रवीकीर्ती स

नगर मनपाचा कर्मचारी खेळणार… ’कोण होणार करोडपती’
जलसिंचनाचे योग्य नियोजन केल्यास परिसर समृद्ध होतो : सुवर्णा माने
प्रवराच्या उजव्या कालव्यात अनोळखी प्रेत सापडले

भातकुडगाव फाटा प्रतिनिधी ः समाजभूषण आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगावची विद्यार्थिनी कु.गायत्री रामनाथ जवादे ही रवीकीर्ती संस्कृत अध्ययन केंद्र सांगली द्वारा आयोजित संस्कृत राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत 50पैकी 48 गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम आली आहे.
परीक्षेला विद्यालयातून एकूण 35 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गायत्रीच्या या यशाबद्दल आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रमुख अ‍ॅड.डॉ. विद्याधरजी काकडे, जि.प.सदस्या हर्षदाताई काकडे, संस्थेचे विश्‍वस्त पृथ्वीसिंगभैया काकडे, संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी लक्ष्मण बिटाळ, विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे, उपमुख्याध्यापिका मंदाकिनी भालसिंग, पर्यवेक्षिका श्रीमती पुष्पलता गरुड, पर्यवेक्षक श्री.लक्ष्मण गाडे व सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी अभिनंदन केले व विद्यालयातर्फे भगवद्गीता हा संस्कृत ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संस्कृत विषय शिक्षक सागर देहाडराय यांनाही सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांना संस्कृत विषय शिक्षक सागर देहाडराय, ज्ञानेश्‍वर शेळके, गोविंद वाणी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

COMMENTS