Homeताज्या बातम्या

कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द कराअकोलेत किसान सभेची निदर्शने

अकोले : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयात विविध अटी घातल्याने मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा आ

सरसकट कर्जमाफीसाठी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम  शिंदे शिवसेना शेतकरी सेनेचे राहुरीत आंदोलन
कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द करा या मागणीसाठी किसान सभेची निदर्शने
अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका


अकोले : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयात विविध अटी घातल्याने मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा आरोप करीत किसान सभेच्या वतीने अकोले येथे निदर्शने करण्यात आली.
किसान सभेच्या निवेदनानुसार, २०१९ मधील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या कर्जमाफीमध्ये केवळ ५० हजार रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी उर्वरित कर्जाची पूर्ण परतफेड करण्याची अट घालण्यात आली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही किमान चार वेळा कर्जाची परतफेड केलेली असावी, अशी अट ठेवण्यात आली असून त्यांनाही केवळ ५० हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
या अटी तातडीने रद्द करून शेतकऱ्यांचा सातबारा संपूर्ण कर्जमुक्त करण्याचे आश्वासन शासनाने पूर्ण करावे, अशी मागणी किसान सभेने केली आहे. या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आले असून विविध ठिकाणी शासन निर्णयाच्या प्रती जाळून निषेध व्यक्त केला जात आहे.
अकोले येथे झालेल्या निदर्शनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच सहकारी संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांनाही निवेदने देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या राज्य शासनापर्यंत पोहोचविण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.  

COMMENTS