Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमधील घटना ः मृतांच्या नातेवाईकांना 3 लाखांची मदत जाहीर

पुणे: पिंपरी चिंचवडच्या रावेत परिसरात काल जाहिरातीचे लोखंडी फलक कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदोष मन

दूधगंगा गैरव्यवहार प्रकरणी व्यवस्थापक अटकेत
ऋषभ पंत वर्ल्ड कप आणि आशिया कपमधून बाहेर
निघोज येथील मंगल कार्यालय नियम मोडल्याने सील LokNews24

पुणे: पिंपरी चिंचवडच्या रावेत परिसरात काल जाहिरातीचे लोखंडी फलक कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदोष मनुष्यवधाचा आणि अनधिकृत जाहिरात फलक लावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. अद्याप यातील कोणीही रावेत पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या चारही जणांचा शोध सुरु आहे. या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले. तसेच त्यांनी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 3 लाखांची मदत जाहीर केली.

पिंपरी-चिंचवडच्या रावेत भागात होर्डिंग कोसळले होते. होर्डिंग्जच्या खाली पंक्चरचे दुकान दबले गेले होते. त्यावेळी दुकानाजवळ सात ते आठ व्यक्ती होते. या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. शोभा विजय टाक (वय 50), वर्षा विलास केदारी (वय 50), रामअवध प्रलाद आत्मज (वय 29), भारती नितीन मंचल (वय 33) आणि अनिता उमेश रॉय (वय 45) या पाच जणांचा या घटनेत मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेचा तपास रावेत पोलिसांकडून सुरु आहे. रावेत पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरेणात पोलिसांनी जागा मालक नामदेव बारकू म्हसुडगे, होर्डिंग तयार करणारा दत्ता गुलाब तरस, होर्डिंग भाड्याने घेणारा महेश तानाजी गाडे, जाहिरात करणारी कंपनी आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील दोषी आरोपींना अटक करण्यासाठी रावेत पोलिसांनी चार पोलिसांची पथके तयार केली आहेत. याप्रक्ररणी मुख्यमंत्री कार्यालयाकडून होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी ट्विट करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, ’कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वार्‍यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

COMMENTS