Homeताज्या बातम्या

आनंदगाव बाल लैंगिक अत्याचार प्रकरण: माजलगाव न्यायालयाकडून आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

तालुक्यातील आनंदगाव येथील मोगरा शिवारात 28 एप्रिल रोजी घडलेल्या कथित विनयभंग व मारहाण प्रकरणात न्यायालयाने संशयित आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर क

गुलाब देत पोलीस म्हणाले, जीव तुमचा आहे अन् नियमही तुमच्यासाठीचबीड पोलीसांनी फुलातून फुलवला वाहतुक शिस्तीचा संदेश
बीड जिल्हा शिवसेनेला मिळाला तरुण तडफदार चेहरा!इरफान कुरेशी यांची शिवसेना अल्पसंख्याक आघाडी जिल्हाप्रमुखपदी निवड
केज नगरपंचायतीमार्फत 20-25 वर्षांपासून प्रलंबित अतिक्रमणधारकांचा प्रश्न मार्गीएका महिन्यात पीटीआर वाटपाचे आश्वासन



तालुक्यातील आनंदगाव येथील मोगरा शिवारात 28 एप्रिल रोजी घडलेल्या कथित विनयभंग व मारहाण प्रकरणात न्यायालयाने संशयित आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी अर्ज क्र. 146/2026 नुसार माजलगाव येथील माननीय न्यायालयात सुनावणी झाली.
प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, फिर्यादीने 30 एप्रिल रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार 27 व 28 एप्रिल रोजी आनंदगाव परिसरात किरकोळ वादातून विनयभंगाची घटना घडल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी शाम शिवाजी थावरे यांच्यासह इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अटक टाळण्यासाठी आरोपी क्र. 2 यांच्या वतीने अ‍ॅड. हरीष घायतीडक पाटील यांनी माजलगाव न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने युक्तिवाद करत तक्रार उशिरा दाखल झाल्याचा तसेच घटनाक्रमातील विसंगती व आरोपींच्या भूमिकेबाबत अस्पष्टता असल्याचा मुद्दा मांडला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींचा स्थानिक रहिवास, तपासात सहकार्याची तयारी आणि प्रकरणातील प्राथमिक बाबी लक्षात घेऊन अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणात अ‍ॅड. हरीष घायतीडक पाटील यांनी काम पाहिले, तर अ‍ॅड. व्ही. बी. लवटे यांनी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. डी. बी. कोरडे व शुभम नाटकर यांनी सहकार्य केले.

COMMENTS