Homeताज्या बातम्या

८१ लाख महिलांना वगळले; बहिणींनो, सरकारवर ४२० चा गुन्हा दाखल करा – प्रा. सुशीलाताई मोराळे

बीड : ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने मतपेटीवर कब्जा करण्यासाठी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे टाकून अक्षरशः मतांची लूट केली. आता

बीड शहरातील मूलभूत सुविधांवर ‘तुतारी गट’ आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांना दिला आंदोलनाचा इशारा
चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
भारताचा पाया माझा भीमराया-प्रा.जगदिश ओहोळ
Sushilatai Morale (@sushilatai.morale) • Facebook

बीड : ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने मतपेटीवर कब्जा करण्यासाठी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे टाकून अक्षरशः मतांची लूट केली. आता राज्याच्या तिजोरीचे दिवाळे निघाल्यावर कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत, अशी नाचक्की व्हायला लागली आहे. त्यामुळेच आता तब्बल ८१ लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आले असून या महायुती सरकारवर फसवणुकीचा ४२० चा गुन्हा दाखल करा, असे आवाहन लोकनेत्या प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केले आहे.

योजना जाहीर झाली तेव्हा २ कोटी ४७ लाख महिला लाभार्थी होत्या, मात्र केवायसी आणि इतर मोहिमांच्या नावाखाली आता केवळ १ कोटी ६६ लाख महिलाच पात्र ठरवून ८१ लाख बहिणींना बाद करण्यात आले आहे. या योजनेवर २०२४-२०२५ मध्ये ३२ हजार ४७० कोटी रुपये खर्च झाले, तर २०२५-२०२६ मध्ये ३० हजार कोटी खर्च झाले. दुसऱ्या वर्षी खर्च कमी झाला कारण आधीच ५० लाख महिलांना बोगस नोंदी म्हणून वगळले होते.

पती सरकारी नोकरीत असणे किंवा वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असणे अशी कारणे दाखवून दरमहा हजारो महिलांना बाद केले जात आहे. फक्त लाडक्या बहिणीच्या मतांवर डल्ला मारून हे सरकार सत्तेत आले असून, या सरकारने तातडीने राजीनामा द्यावा किंवा राष्ट्रपतींनी हे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केली आहे.

COMMENTS