बीड : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि किरण स्पोर्ट्स सोलापूर यांच्या विद्यमाने आयोजित ५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी ख

बीड : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि किरण स्पोर्ट्स सोलापूर यांच्या विद्यमाने आयोजित ५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा सोलापूर येथे २ ते ५ जून २०२६ या कालावधीत पार पडत आहे. या स्पर्धेत बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कुमार व मुलींचे दोन्ही अंतिम संघ जाहीर झाले असून ते स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.
या स्पर्धेसाठी एमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या वतीने कुमार संघाचे प्रशिक्षण शिबिर शारदा स्पोर्ट्स अकॅडमी (गेवराई) आणि मुलींचे शिबिर राजर्षी शाहू कन्या विद्यालय (बीड) येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातून अंतिम संघांची निवड करण्यात आली.
बीड जिल्हा संघ पुढीलप्रमाणे:
- कुमार संघ (मुले): सुशांत तलवाडे (कर्णधार), आयुष दिवाण, सौरभ खरात, करण मोमीन, आर्यन घोलप, निशांत तलवाडे, कार्तिक सावंत, माऊली चोरमले, आकाश उकांडे, हर्षद हंबर्डे, शंभुराज नलावडे, वैभव शेळके, सार्थक धस, सचिन भांडवले, हरिओम मांडवे. प्रशिक्षक: नवनाथ चव्हाण, व्यवस्थापक: भरत यादव.
- मुलींचा संघ: अक्षरा चोले (कर्णधार), संपदा थापडे, भक्ती थापडे, नंदिनी बोरगे, कीर्ती येवले, सानिका शिवनगे, अक्षरा शेलकर, श्रद्धा करे, ममता अंधारे, प्रतीक्षा येवले, यज्ञा काळे, सोनाली कोल्हे, समृद्धी घोलप, दुर्गा नाईकनवरे. प्रशिक्षक: तुकाराम करंडे, व्यवस्थापिका: रोहिणी देवगुडे.
या दोन्ही संघांना जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, पृथ्वीराजे पंडित, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. जे. पी. शेळके, रमेशभाऊ शिंदे, राजेंद्र बरकसे, बापूसाहेब तारूकर, असोसिएशनचे सचिव विजय जाहेर यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS