खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत सोयाबीन बियाणे वितरण योजनेसाठी निवड झालेल्या शेतकरी ग्राहकांना प्रत्यक्षात बियाणे उपलब्ध नसल्याने मानसिक व आर्थिक त्रा

खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत सोयाबीन बियाणे वितरण योजनेसाठी निवड झालेल्या शेतकरी ग्राहकांना प्रत्यक्षात बियाणे उपलब्ध नसल्याने मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तात्काळ बियाण्यांचा पुरवठा करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी केली आहे.
खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी निवड झालेल्या शेतकर्यांना कृषी विभागाकडून संदेश प्राप्त झाले असून, पाच दिवसांच्या आत लाभ घ्यावा असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात कृषी विभागाकडे तसेच नियुक्त कृषी विक्रेत्यांकडे बियाणे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकर्यांना वारंवार संबंधित कार्यालये व विक्रेत्यांकडे फेर्या माराव्या लागत असून त्यांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने लाभार्थी निवडून संदेश पाठविल्यानंतरही बियाणे उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे अनिल बोर्डे यांनी म्हटले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ग्राहकांनी संदेशाची प्रत, सातबारा उतारा, 8-अ, आधार कार्ड तसेच फार्मर आयडी ही आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे. कृषी विभागाने तात्काळ बियाणे उपलब्ध करून शेतकरी ग्राहकांची गैरसोय दूर करावी व त्यांना मानसिक व आर्थिक त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी अनिल बोर्डे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

COMMENTS