Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगाव जामोद बसस्थानकात घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड

https://www.youtube.com/watch?v=ppNhKOqdEfg एकेकाळी स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात सलग चार ते पाच वर्षे अव्वल ठरलेले जळगाव जामोद ब

वेरूळमध्ये शहर बसच्या इंजिनचा स्फोट
आष्टी बसस्थानकाची दुरवस्था; प्रवाशांचे हाल कायम, काम 8 वर्षांपासून रखडले
एसटीचे स्मार्ट कार्ड जादा; दराने विक्री केल्यास कारवाई; परिवहन मंत्री सरनाईक; परवाने रद्द करण्याचा इशारा

एकेकाळी स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात सलग चार ते पाच वर्षे अव्वल ठरलेले जळगाव जामोद बसस्थानक आज स्वतःच्या अस्तित्वासाठी अश्रू ढाळत आहे. येथील डेपो मॅनेजरचा कमालीचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे या बसस्थानकाचे वैभव आता पूर्णपणे धुळीस मिळाले असून, प्रवाशांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मे महिन्याचं रखरखतं ऊन, अंगाची लाहीलाही करणारी उष्णता… अशा परिस्थितीत जळगाव जामोद बसस्थानकावर प्रवाशांची अवस्था काय आहे, हे पाहिल्यावर कोणाचेही डोळे पांढरे होतील. बसस्थानकावर ‘थंडगार पाणी’ अशी मोठी पाटी लावण्यात आली आहे, पण प्रत्यक्षात तिथल्या नळांना थेंबभरही पाणी नाही! पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांना या कडक उन्हात बाहेर भटकावे लागत आहे. इतकंच नाही, तर डोक्यावर असणारे पंखे केवळ शोभेच्या वस्तू बनले आहेत. एक-दोन पंखे सोडले तर सर्व पंखे बंद अवस्थेत आहेत.
दुसरीकडे, बसस्थानकातील सुलभ शौचालयाची अवस्था इतकी भीषण आहे की, तिथल्या दुर्गंधीमुळे प्रवाशांना दोन मिनिटे उभे राहणेही कठीण झाले आहे. आता धक्कादायक बाब अशी की, एसटी महामंडळ प्रत्येक प्रवाशाकडून ‘स्वच्छता निधी’च्या नावाखाली तब्बल २ रुपये गोळा करते. मग प्रवाशांच्या खिशातून जाणारा हा पैसा नेमका जातो कुठे? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

COMMENTS