Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बांद्र्यातील कारवाईनंतर राजकारण तापले; बेकायदेशीर घरं आणि मशिदींवर चालणार हातोडा; नितेश राणे पुन्हा आक्रमक

मुंबई : राज्यातील बेकायदेशीर बांधकामे आणि अवैध घुसखोरांविरोधात सत्ताधारी पक्षाचे नेते अत्यंत आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या बांद्रा परिसरातील

पाथर्डी पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक शंकरवाडीत गावठी हातभट्टी उद्ध्वस्त, लाखाचा मुद्देमाल जप्त!। लोकमंथन News२४
नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई ; ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’मध्ये 43 लाखांचा अवैध शस्त्रसाठा जप्त
ठाण्यात मराठी महिला विक्रेतीला विरोध परप्रांतीयांना शिवसैनिकांनी भरबाजारात शिकवला धडा।लोकमंथन News२४

मुंबई : राज्यातील बेकायदेशीर बांधकामे आणि अवैध घुसखोरांविरोधात सत्ताधारी पक्षाचे नेते अत्यंत आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या बांद्रा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर झालेल्या कारवाईनंतर, आमदार नितेश राणे यांनी थेट आणि कडक शब्दांत इशारा दिला आहे.
नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे की, सरकारी जमिनींवर जर बेकायदेशीर घरं किंवा मशीद बांधली असेल, तर ती उपटून फेकून दिली जाईल. निवडणुकीच्या वेळी जनतेला दिलेल्या वचनाची आठवण करून देत, त्यांनी या भागातून बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना बाहेर काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, ही कारवाई केवळ बांद्रापुरती मर्यादित नसून, राज्यातील इतर अनेक ठिकाणी अशा पूर्ण साफसफाईची मोठी गरज आहे. त्यामुळे सर्व बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी आता आपल्या गाड्या पॅक कराव्यात आणि इथून निघून जावे, असा थेट सज्जड दमच त्यांनी भरला आहे.
नितेश राणे यांच्या या वादळी विधानामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. मात्र, यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, प्रशासन आता अवैध घुसखोर आणि सरकारी जमिनींवरील बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध कोणतीही तडजोड न करता अत्यंत कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

COMMENTS