Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आज  सावरगाव येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन

मुखेड प्रतनिधी - मुखेड तालुक्यातील सावरगाव(पि.) पवित्र श्रावण मास निमित्त 1 ऑगस्ट रोजी विनोदाचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन ह

थंडीच्या लाटेने मुंबईसह राज्यात पारा घसरला
व्यंकटेश पतसंस्थाच्या दोन संचालक गजाआड ; २ कोटी अफरातफर घोटाळा प्रकरण
भिवंडीला मुंबईहून जादा वीस लाख लीटर पाणी

मुखेड प्रतनिधी – मुखेड तालुक्यातील सावरगाव(पि.) पवित्र श्रावण मास निमित्त 1 ऑगस्ट रोजी विनोदाचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. भाजपाचे नेते रामराव मस्कले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या किर्तन सोहळयाचे उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रताप पाटील चिखलीकर हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ.तुषार राठोड, भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे हे राहणार आहेत. तसेच अन्य मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
श्रावण महिना हा हिंदू धर्माचा पवित्र असा महिना असून या महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून भाजपचे नेते रामराव मस्कले यांनी तालुक्यातील व या भागातील जनतेस व भाविकांसाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तन सोहळा आयोजित केला आहे. या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रामराव मस्कले व सावरगाव (पी.),सावरगाववाडी, कामजळगा, मग्याळ, सांगवी (बे.), लादगा, शिकारा, शिरुर (द.) येथील मित्रमंडळाने केले आहे.

COMMENTS