Homeताज्या बातम्याअहमदनगर

संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी

संगमनेर :  संगमनेर तालुक्याला भंडारदरा व निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, रोटेशन काळात शेतीसाठी पूर्ण दाबाने ११ तास वीजपुरवठा करावा तसेच शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा मंजूर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी संगमनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन दिले.महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याने प्रतिकूल परिस्थितीतही विकासाची वाटचाल केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या पाणी व वीज प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले, साखर संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे, फेडरेशनचे चेअरमन राजेंद्र गुंजाळ, ऍड. नानासाहेब शिंदे, मीननाथ वर्पे , विनोद हासे, सतीश वर्पे यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर वीज वितरण विभागाचे मुख्य अधीक्षक अभियंता यांनाही आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी दिले.निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर तालुका हा पर्जन्यछायेतील, डोंगराळ व अतिदुष्काळी भाग असून येथे दरवर्षी सरासरी दहा इंचांपेक्षाही कमी पाऊस पडतो. मोठ्या संघर्षानंतर १९८९ मध्ये संगमनेर तालुक्याला हक्काचे ३० टक्के पाणी मंजूर झाले होते. तसेच उपसा सिंचन योजनांसाठी आवर्तन काळात दररोज किमान १६ तास वीजपुरवठा आवश्यक असल्याचे आदेश असतानाही प्रत्यक्षात पुरेशा वीजेचा पुरवठा होत नसल्याची तक्रार करण्यात आली.वीज नियामक आयोगाच्या निर्णयानंतर २०१० मध्ये रोटेशन काळात ११ तास पूर्ण दाबाने वीज देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हा पुरवठा बंद झाल्याने शेतकऱ्यांना हक्काचे पाणी उचलता येत नसल्याचा आरोप करण्यात आला. परिणामी संगमनेरचा हिस्सा खालच्या भागात वापरला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निळवंडे कालव्यांचे काम पूर्ण होऊनही संगमनेरच्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यात तीव्र नाराजी पसरली असून वाढती उष्णता, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि पशुधनाचे हाल यामुळे परिस्थिती गंभीर बनत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

घर कोसळून महिलेचा मृत्यू ; पाच जखमी
AHMEDNAGAR | पावसामुळे ऊस तोड मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल
पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल शनिचरणी

COMMENTS