Homeताज्या बातम्याफीचर

  नाशिकची धुळवड आणि जीवनाची परवड ! 

साधारण गौरी गणपती आटोपले आणि हलकी हलकी थंडी ची चाहूल नाशिककरांना वाटू लागली. मात्र शांत असलेलं नाशिक शहर आता एका मोठ्या गर्तेत दिवसेंदिवस  गुंतत

स्वायत्त महाविद्यालयांसाठी विद्यापीठाकडून मार्गदर्शक सूचना
कोकण ट्रिपसाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईवर कोयत्याने वार | LOK News 24
FILMY MASALA : तेजस्विनी पंडित ने मागितली चाहत्यांची माफी LOK News 24 | (Video)

साधारण गौरी गणपती आटोपले आणि हलकी हलकी थंडी ची चाहूल नाशिककरांना वाटू लागली. मात्र शांत असलेलं नाशिक शहर आता एका मोठ्या गर्तेत दिवसेंदिवस  गुंतत चाललेलं दिसतं आहेत. हा निसर्गाचा परिणाम नसून कृत्रिमरीत्या बनावटीच्या मानवीकृत हिंसाचार वाढत चाल लेला आता पृथ्वी माईला पेलवेनसा झालाय. थकलेली धरणीमाई आता वय झालं म्हणून आवाज तर देत नसेल. माझा आवाज कुणी एकतय का ? कुणीच का बरे ऐकत नसावे ! 

दिल्ली , मुंबई , चेन्नई सारख्या मेट्रो शहरा पाठोपाठ आता नाशिक शहराने देखील आपल्या प्रसूती वेदना सांगायला सुरूवात केली आहेत. हे जर लवकर शांत नाही केलेत तर माझा पुनर्जन्म नक्की होईल . ती वेळ जवळ आली आहेत. गुण्या गोविंदान मी तुमच्या सोबत असतांना का मला उलथापालथ करण्यास भाग पाडत आहात ते समजत नाहीत.

मी तुमचं संरक्षण करत असतांना मला ह्या बाळंत वेदना का देत आहात. तुम्ही शांत राहिला नाही तर मी देखील आक्रमक होणार यात शंका नाहीत. माझ्यावर कसले कसले भार टाकत आहात विशिष्ट जागेवरच का मला त्रास देत आहात एकाच ठिकाणी माझी गळचेपी करायला सुरुवात केली तर त्याच ठुकाणी छिद्रे पडेपर्यंत मला त्रास देतात , त्यामुळे आता माझा संयम सुटत चाललेला आहेत.

मला वाटत नव्हतं नाशिक मध्ये देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही माझी एवढी नासधूस करणार म्हणून , माझ्यात सामावलेली गोदा माय , पांडव लेणी कडे असलेला कचरा डेपो , लाखोंच्या संख्येने असलेली नागरी वस्ती व लाखो नागरिक तुम्ही माझी काळजी कधी घेणार आहात की नाही.?  की चांगल्या पर्यावरणाच्या नावाखाली मला कितीसा त्रास देणार ! 

शहरातील प्रत्येक रस्ता हा गर्दीने फुललेला दिसतो दरवाज्या वर फुलांची तोरणं असतात की दुरून बघितल्यावर नाशिक देखील वाहनांच्या तोरणाने सजलेले वाटते. 

परंतु नाशिक आता गर्द धुळीच्या साम्राज्या कडे वाटचाल करत आहेत यात शंका नाहीत.मोठ्या शहरापाठोपाठ नाशिक आता दूषित हवा , व दूषित पाण्याच्या विळख्यात अडकत चाललेलं दिसतं आहेत. 

एन दसरा दिवाळीत ही हौस मौस वेगळी असायची परंतु हेच सणासुदीचे दिवस आता आजारपण वगैरे वगैरे वेगळ्या काही कारणांनी गुरफटलेले दिसतात असो 

सांगायचे एवढेच की समस्त मानव जाती कडून होत असलेला पर्यावणीय ह्रास आपणास थांबवता येईल का ? असे बघितले पाहिजे. 

नाशिकची हवा प्रदूषित होत असतांना ती मानवासाठी परवडणारी दिसत नाहीत. पुढे जाऊन आपणच आपला अपमान करून घेऊ असे वाटत असल्यास यावर प्रतिबंधात्मक उपाय शोधून मानवाचे कल्याण साधने हेच उचित ठरेल अथवा आपले कधी मुंबई दिल्ली होईल सांगता येत नाही. 

नाशिक मध्ये धुळीच्या वाढत्या प्रमाणात आजार देखील डोके वरती काढत आहेत  श्वसणाचे विकार , दमा , डोळ्यांचे विकार , धुळमय वातावरण हे आपले आरोग्य खराब करत असून पर्यावरण साधत असतांना शहरात किमान गाडीचा वेग ठरवून दिल्यास बरे होईल. किमान जोरात सुटणाऱ्या गाडीमधून किमान कमी धूळ उत्पन्न होईल। 

अवजड वाहने , धूर सोडणारे वाहने , कर्ण बधिर करणाऱ्या मोटारसायकली व त्यांचा अति वेग , 

सिग्नलवर कुणीही नियम पाळत नसल्याने गाड्यांचा एकमेकांना क्रॉस करून जाण्याची प्रथा सध्या शहरात बळावत आहेत ? यावर प्रतिबंध घालणे गरजेचे आहेत असे वाटते.

पहाटे पहाटे चार वाजता मॉर्निंगवाकला निघायचं तर शुद्ध श्वास नाहीच. सर्व आदल्या दिवसाची धुळवड नाशिक ची धरणीमाई पोटात घेण्यासाठी अख्खी रात्र जागवून काढते दिवस उजाडतो दुसऱ्या दिवसाचे  दुपारचे  १२ वाजता मात्र धरणीमाई शांत झालेली दिसत नाहीत. काही प्रमाणात शांत होण्याचा टाईम होताच पहाट पासून गाड्यांची वर्दळ सुरू झालेली असते त्यात ह्या वर्षी पाहिजे तेवढा पाऊस न झाल्याने धुळीचे कण जोर करत असतांना आजार देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न करत आहेत. 

दिवस भर नाशिक मध्ये मोटारसायकल वरून एक चक्कर मारून आले तरी डांबरट धूळ शरीरावर आक्रमण करते. 

यावर उपाय म्हणून शिक्षित , तात्त्विक माणसांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलेला उपाय एकूण मी देखील अवाक झालो. 

मला त्यात काही गैर वाटले नाहीत कारण शरीर सरंक्षण साठी ते योग्यच मात्र धुळीचे , नियमांचे , निसर्गसौंदर्य , हळवेपणा , संस्कृती , ही आपली जबाबदारी नाहीत का ? सरळ सरळ पणे प्रश्न विचारला तर आपल्याला काय त्याचे आपण आपलं बघूया म्हणून डावरून देत पळ काढला. 

असो सामाजिक कार्यात सरकारी अधोरेखित केलेली यंत्रणा व मानव यांच्यात मेळ बसल्यास परत एकदा आवणास आपले पर्यावरण नक्की मिळेल व धरणीमाईला देखील आनंद होईल. 

योगेश रोकडे निवासी संपादक  ९४२२८९२१९८

COMMENTS