Homeताज्या बातम्याअहमदनगर

बेकायदेशीर रस्त्यामुळे शेतजमिनीचे नुकसानचौकशी व नुकसानभरपाईसाठी श्रीगोंदे तहसिलसमोर उपोषण

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेच्या हद्दीतील गट क्रमांक १२०६/५ व १२०६/६ मधून करण्यात आलेल्या कथित बेकायदेशीर रस्त्यामुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करत हिंगडे कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी व नुकसानभरपाईची मागणी केली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, न्याय न मिळाल्याने १८ मे २०२६ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले.जयश्री नानासाहेब हिंगडे, शोभा अरुण हिंगडे, आशा शाहाजी हिंगडे, इंदुबाई अशोक हिंगडे, मंगल बबन हिंगडे तसेच इतर कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित गट क्रमांकातील शेतजमिनीत यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या रस्त्याची नोंद नव्हती. तसेच नकाशामध्येही रस्ता दर्शविण्यात आलेला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.निवेदनानुसार, श्रीगोंदा नगरपालिकेकडून दलित सुधार योजनेच्या निधीतून संबंधित ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता रात्रीच्या वेळी रस्त्याचे काम करण्यात आले. हे काम पूर्णपणे अनधिकृत असल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. संबंधित रस्त्याचे काम सुरू असताना विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास राजकीय दबाव टाकून दमदाटी व मारहाण करण्याच्या धमक्या देण्यात आल्याचाही गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.हिरडे कुटुंबीयांनी पुढे म्हटले आहे की, संबंधित गटाच्या पूर्वेकडील बाजूस आधीपासूनच पक्का रस्ता अस्तित्वात असून तो सध्या वापरात आहे. त्यामुळे नव्याने रस्ता काढण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. तरीदेखील नवीन रस्ता तयार केल्यामुळे शेतजमिनीत वाहतूक करण्यास अडथळे निर्माण झाले असून शेती व्यवसायावर परिणाम झाला आहे. परिणामी पिकांचे नुकसान होऊन कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न बंद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी. या मागणीसाठी  १८ मे पासून हिरडे कुटुंबीय आपल्या पाळीव प्राण्यांसह उपोषणास बसले.

‘मंथन’ परीक्षेत ‘डीबीएम’चे 86 विद्यार्थी गुणवत्ता यादीत
‘संत ज्ञानेश्वर’चा दहावीचा १०० टक्के निकाल
संजीवनी पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश सुविधा केंद्र
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 49;

COMMENTS