शेवगाव : शेवगाव व पाथर्डी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडी विरोधात वन विभागाने गुरुवारी (दि. १४) मोठी कारवाई केली. पाथर्डी तालुक्यातील मौज

शेवगाव : शेवगाव व पाथर्डी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडी विरोधात वन विभागाने गुरुवारी (दि. १४) मोठी कारवाई केली. पाथर्डी तालुक्यातील मौजे कोरडगाव परिसरात वन अधिकारी पथकाने छापा टाकून अवैध वृक्षतोड सुरू असताना टेम्पो वाहनासह इतर साहित्य ताब्यात घेत कारवाई केली.ही कारवाई माननीय उपवनसंरक्षक, अहिल्यानगर, धर्मवीर साल विठ्ठल, सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी दिघे व सहाय्यक वनसंरक्षक, गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, मिलिंद गोवेकर यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली.वन विभागाच्या या कारवाईमुळे लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली असून संबंधितांवर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी अशाच प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन विभागाकडून कठोर पावले उचलली जात असून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नसल्याचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

COMMENTS