Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भविष्यात पर्यटन क्षेत्रात मोठी संधी- किशोर मरकड 

अहमदनगर- पर्यटन व्यवसाय हा आघाडीवरील व्यवसाय होता मात्र कोव्हिडं मुळे गेली दीड वर्षापासून या व्यवसायाला  उतरती कळा लागली आहे मात्र आता देशातील पर

15% लाभांश देण्याची परंपरा याहीवर्षी अबाधित : आ.काळे
शिक्षकांच्या सभेत गोंधळ…धक्काबुक्की व तोडफोड
गोरगरीबांचे आशीर्वाद जीवनात महत्वाचे – हभप दीपक महाराज देशमुख

अहमदनगर-

पर्यटन व्यवसाय हा आघाडीवरील व्यवसाय होता मात्र कोव्हिडं मुळे गेली दीड वर्षापासून या व्यवसायाला  उतरती कळा लागली आहे मात्र आता देशातील पर्यटन पुन्हा सुरू झाले आहे या पुढील काळात मात्र भविष्यात हा व्यवसाय अधिक तेजीत येईल असा विश्वास अहमदनगर टुरिझम फोरमचे अध्यक्ष व चैतन्य ट्रॅव्हल चे संचालक किशोर मरकड यांनी व्यक्त केला अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संचलित इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अहमदनगर या महाविद्यालयाच्या वतीने जागतिक पर्यटन दिनानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रातील भविष्यातील वाटचाल या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते या वर्षी युनायटेड नेशन च्या व टुरिझम ऑर्गनायझेशन जागतिक पर्यटन दिनानिमित् इन्कलुजीव टुरिझम फॉर ऑल ही संकल्पना पर्यटन विकासासाठी मांडलेली आहे. जगभरामध्ये विविध कार्यक्रम करून पर्यटनास वृद्धिंगत करण्यासाठी हा दिवस साजरा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यानुसार महाविद्यालयाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले त्यामध्ये पोस्टर पेंटिंग स्पर्धा, सेल्फि ऑफ लोकल टुरिस्ट स्पॉट ,प्रश्न मंजुषा, व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनानिमित्त व्याख्यानमालेत ते बोलत होते ते पुढे म्हणाले की पर्यटन व्यवसाय हा असा व्यवसाय आहे की जो व्यवसाय एकाचवेळी अनेकांना रोजगार उपलब्ध करून देतो त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनेक जण यामध्ये जोडली जातात, त्यामुळे सर्व जग हे पर्यटनाकडे विशेष लक्ष देत आहे काही देशांमध्ये पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे ते देश आपल्या पर्यटकांसाठी दरवर्षी वेगळं काही देण्याचा प्रयत्न करत असतात हॉटेल मॅनेजमेंट मध्ये खूप मोठी संधी तरुणांना आहे कारण जेवढे पर्यटक व प्रवासी वाढतील तेवढी गरज ही हॉटेलची राहणार आहे एक मोठे हॉटेल एक लघुउद्योग कारखाना एवढे रोजगार देऊ शकतात मात्र हे क्षेत्र हे उत्तम उत्तम सर्विस देणार असल्याने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे पर्यटनाच्या बाबतीत भारतातील पर्यटक हे अतिशय जागृत असून सर्व देशांमध्ये भारतातील पर्यटक फिरताना आपल्याला दिसतात तसेच भारतातील पर्यटन वाढण्यासाठी प्रयत्न चालू असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक हे भारतात पुढील काळी येथील त्यामुळे या क्षेत्रातील प्रत्येकाला व्यवसाय मिळणार आहे त्यामुळे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे प्रारंभी महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर नंदकुमार जगताप यांनी स्वागत केले, तर प्राचार्य योगिता सत्रे यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन व परिचय प्राध्यापक बाळासाहेब शेंडगे यांनी तर आभार प्राध्यापक रचना खटावकर यांनी मानले या कार्यक्रमात प्रा. गोकुळ सोनवणे, प्रा. वहीत मणियार, प्रा. अनुभव वाजपेयी, प्रा. सागर माळवदे प्रा. प्राची चव्हाण व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला

COMMENTS