शहरातील खासबाग देवी मंदिर ते मोमिनपुरा बायपास या मार्गादरम्यान असलेल्या नदीपात्रातून नागरिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत असल्याने येथे

शहरातील खासबाग देवी मंदिर ते मोमिनपुरा बायपास या मार्गादरम्यान असलेल्या नदीपात्रातून नागरिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत असल्याने येथे तातडीने मजबूत पुलाची उभारणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष शेख शाकेर यांनी केली आहे.
बार्शी नाका परिसरातील पुलावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक नागरिक पर्यायी मार्ग म्हणून नदीपात्रातील या रस्त्याचा वापर करत आहेत. मात्र या ठिकाणी कोणताही सुरक्षित पूल नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोजंदारीने प्रवास करणार्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर हा मार्ग पूर्णपणे बंद होतो, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. परिणामी दैनंदिन वाहतूक विस्कळीत होऊन पर्यायी मार्गांवर अतिरिक्त ताण येतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून या मार्गावर तातडीने मजबूत पुलाची उभारणी करावी, अशी जोरदार मागणी शेख शाकेर यांनी केली असून, या प्रश्नावर तातडीने कार्यवाही व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS