Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वृक्ष वेद फाउंडेशन व वृक्षमित्र संघटनेच्या वतीने वृक्षारोपण

पुणतांबा/प्रतिनिधीः वृक्ष वेद फाउंडेशन व वृक्ष मित्र संघटना पुणतांबा यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष संवर्धन आज काळाची गरज असून वृक्ष

रेखा जरे यांची हत्या प्रेमसंबधांतून ; बाळ बोठेसह इतर आरोपीविरुद्ध पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला सुटणार उन्हाळी आवर्तन
तिघांवर गुन्हा दाखल, एक सावकार जेरबंद; कर्जत पोलिसांची सावकारांविरुद्धची मोहीम सुरूच

पुणतांबा/प्रतिनिधीः वृक्ष वेद फाउंडेशन व वृक्ष मित्र संघटना पुणतांबा यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष संवर्धन आज काळाची गरज असून वृक्ष संवर्धनामुळे नैसर्गिक समतोल राहतो. मात्र आज सर्वत्र वृक्ष लागवडीकडे सर्वांचे लक्ष आहे. वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे.असे वक्तव्य  वृक्षवेद फाउंडेशनचे संतोष गव्हाणे, प्रल्हाद पाडेकर यांनी सांगितले
यावेळी वृक्षमित्रअभिषेक भामरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष वाढणे, अमित धनवटे, संकेत वाढणे, अमित जोशी, शंतन विश्‍वासराव, ओमकार थोरात, सिद्धार्थ विश्‍वासराव, पवन गायकवाड आदी युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षवेद फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेऊन वृक्ष संवर्धन जोपासण्याचे काम चालू आहे. अंजनापुर तालुका कोपरगाव येथे फाउंडेशनच्या वतीने वृक्ष लागवड गावात करण्यात आली असून, गावातील परिसर हिरवागार झाला आहे. प्रत्येकाने एक वृक्ष लावून आपलं कर्तव्य पार पडावे.असे आवाहन यावेळी करण्यात आले.

COMMENTS