Homeताज्या बातम्याअहमदनगर

पोहेगाव, दहेगाव बोलका येथे ‘महाराजस्व’ उत्साहात  

कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव व दहेगाव बोलका येथे भाजपा व महायुती सरकारच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या  छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोपरगावच्या नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.दहेगाव बोलका तसेच पोहेगाव महसूल मंडळातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेले हे शिबीर सोमवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पार पडले. शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या विविध महसुली व शासकीय अडचणींचा प्रशासनाकडून जागेवरच निपटारा करण्यात आला. मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिरात सहभाग घेत विविध सेवा व योजनांचा लाभ घेतला.यावेळी शासकीय व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक ती मदत व मार्गदर्शन केले. आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या लोकाभिमुख कार्याचाही यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला. शासनाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारी उपलब्ध करून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मान्यवरांनी सांगितले.शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार, सातबारा उताऱ्यातील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीसह सातबारा व आठ-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जातीचे दाखले, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (एनए) परवानगी आदी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्याची प्रक्रियाही राबविण्यात आली. या प्रसंगी सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानदेव औताडे, संजय औताडे, बापूसाहेब औताडे, अशोक औताडे, नानासाहेब गव्हाणे, रमेश औताडे, विजय डांगे,  विक्रम पाचोरे, कैलास रहाणे, शंकर औताडे, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मयूर कांडेकर यांच्यासह महसूल, कृषी व पुरवठा विभागातील अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या संदेशाला भाजप कार्यकर्त्यांचाच हरताळ?नायगावच्या आमदारांच्या वाढदिवसासाठी नांदेड शहर बॅनरबाजीत झाकले; खर्च, इंधन आणि दिखाव्यावर सवाल
मुख्यमंत्री फडणवीस बुलेटवरून विधानभवनातइंधन बचतीचा संदेश ; मंत्री गिरीश महाजनांचा विमानप्रवास
मंत्री पंकजाताईंनी दिलेला शब्द गोपीनाथ गडावरून केला पूर्णदिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या कुटुंबियांना 5 लाखांचा धनादेश सुपूर्दसलीम जहाँगीर यांचा पाठपुरावा ; गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात

COMMENTS