Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

तिरंदाजी विश्वचषकात भारतीय महिला रिकर्व्ह संघाचे सुवर्ण यश; चीनला नमवत पटकावले विजेतेपद

शांघाय : येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय महिला रिकर्व्ह संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम सा

होर्मुझ सामुद्रधुनीतील भारतीय जहाजांवरील हल्ले अस्वीकारार्ह; भारताने मांडली संयुक्त राष्ट्रांमध्ये ठाम भूमिका
एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाच्या दिशेने महाराष्ट्राचे ऐतिहासिक पाऊल; मसुदा समिती स्थापन
मुंबईतील मिरा रोड येथे अमानुष मारहाणीत ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; आईच्या प्रियकराला पोलिसांकडून अटक
बड़ी खबर: भारतीय आर्चरी महिला टीम ने वर्ल्ड कप में जीता गोल्ड, हाईवोल्टेज  फाइनल में चीन को शूट ऑफ में चटाई धूल - India Women Recurve Team Clinch Gold  in archery world

शांघाय : येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय महिला रिकर्व्ह संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात भारताने यजमान चीनचा अत्यंत चुरशीच्या लढतीत ५-४ असा पराभव केला. सामना बरोबरीत सुटल्यानंतर झालेल्या निर्णायक फेरीत भारताने २८-२६ अशी सरशी साधत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि युवा तिरंदाज कुमकुम मोहद या भारतीय त्रिकुटाने दबावाच्या क्षणी संयम राखत दमदार पुनरागमन केले. निर्धारित फेऱ्यांनंतर दोन्ही संघ ४-४ अशा बरोबरीत होते. त्यानंतर झालेल्या निर्णायक शूट-ऑफमध्ये भारतीय खेळाडूंनी अचूक लक्ष्यभेद करत चीनवर मात केली.

या विजेतेपदाला विशेष महत्त्व आहे, कारण उपांत्य फेरीत भारताने तिरंदाजीतील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियाला पराभूत केले होते. २०११ नंतर प्रथमच भारतीय महिला रिकर्व्ह संघाने तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारीसाठीही हे यश खास ठरले असून, तिच्या कारकिर्दीतील हे सातवे विश्वचषक सांघिक सुवर्णपदक आहे. या यशामुळे जागतिक स्तरावरील भारतीय महिला संघाची गेल्या तीन वर्षांपासूनची विजेतेपदाची प्रतीक्षा संपली आहे.

COMMENTS